ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

महादीप परीक्षेत झरी तालुक्याला पहिल्यांदाच यश

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खातेरा शाळेतील यश भोयरची विमानवारीसाठी निवड

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने यवतमाळ जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रम व सामान्य ज्ञानावर आधारित महादीप परीक्षा नुकतीच पार पडली.

या परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खातेरा येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी यश नारायण भोयर याने यश संपादन करत विमानवारीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे.
खातेरा शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी ही जिल्हास्तरीय परीक्षा दिली होती. त्यामधून यश भोयर याची निवड झाल्याने झरी तालुक्याला महादीप परीक्षेत पहिल्यांदाच यश मिळाले आहे.

या यशामुळे शाळेसह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
यशच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खातेराचा नावलौकिक वाढला असून शिक्षकांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

मागील वर्षी शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय परीक्षा दिली होती; मात्र अल्प गुणांमुळे विमानवारीची संधी हुकली होती. यंदा यशने ती उणीव भरून काढत शाळेसोबतच गाव व तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

यशच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. आक्‍केवार सर, विषय शिक्षक जगदीश आरमुरवार, तसेच स्वयंसेवक संगीता कुळसंगे आणि मेघा लसने यांच्या मार्गदर्शन व परिश्रमाचा मोठा वाटा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर