ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

गॅस – पेट्रोल तुटवडाही नेहरूंमुळेच झाला:विजय वडेट्टीवार यांचा भाजपला खोचक टोला; जनतेच्या संयमाचा अंत न पाहण्याचा इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील जनता गॅस सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभी आहे. हायवेवरील हॉटेल्स बंद पडली आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेरील हॉटेल्सही ओस पडली आहेत. पण सत्ताधाऱ्यांची बनवाबनवी अजूनही सुरूच आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधताना केली. सध्याची इंधन टंचाई पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधींमुळेच झाली असेल, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी भाजपला हाणला. इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे सध्या भारताला होणारा इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे देशात सर्वत्र इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक शहरांत गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. त्यातच भाजपने या स्थितीसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जबाबदार धरल्यामुळे काँग्रेसचे पित्त खवळले आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वरील टीका केली आहे. ते म्हणाले, हा गॅस – पेट्रोल तुडवडा पंडित नेहरूंमुळेच झाला असेल! गॅस सिलेंडरसाठी जनता तासन् तास रांगेत उभी आहे, हायवेवरची हॉटेलं बंद पडली आहेत, काँग्रेस कार्यालय बाहेरील हॉटेल बंद आहेत पण सत्ताधाऱ्यांची ‘बनवाबनवी’ अजूनही सुरूच आहे! स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडताना भाजपला लाज वाटत नाही..पाप तुमचं आणि खापर काँग्रेसवर? राहुल गांधीचे नाव भाजपला घ्यायचे नसेल हा तुटवडा पण पंडित नेहरू, इंदिराजी गांधी यांच्यामुळेच झाला,भाजपची ही जुनी टेप आहे. लोकांच्या चुली विझवून कसले नवीन जुमले देत आहेत?जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, उत्तरे द्या, असे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाई व पोलिसांत झालेल्या कथित झटापटीवरही भाष्य केले. या घटनेला त्यांनी थेटपणे भाजपला जबाबदार धरले. ते म्हणाले, राज्याचे गृहखातं झोपलंय की जाणीवपूर्वक डोळेझाक करतंय? साताऱ्यात मंत्र्यावर हल्ला झाला. तेव्हा सीसीटीव्ही बंद होते. हा पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आहे. हा पूर्वनियोजित कट नाही तर काय? हे राज्य सुरक्षित आहे का? मंत्र्यावर हल्ला होतो, सीसीटीव्ही बंद असतात, पुरावे नष्ट केले जातात. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर घडतंय? जनतेला उत्तर हवंय. हे घडवायचे होते म्हणून तिथे पीओपीचे काम काढले. आणि पीओपीचे काम काढले म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. ही वस्तुस्थिती आहे. ते अर्धवट सांगत आहेत. ते पुरावे सापडू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. तो मंत्री (शंभूराज देसाई) अगोदरच फार बारीक किरकोळ आहे. त्याला थोडे बसले. अधिक बसले असते तर महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता, असे वडेट्टीवार म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर