ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुकूटबन च्या  सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी स्वखर्चाने नेऊन निराधार लोकांना केली कागदोपत्राची  मदत.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी गावातील निराधार लोकांना कागदोपत्री साठी मार्गदर्शन केले व तालुक्याच्या ठिकाणी नेऊन स्व खर्चाने स्व पुढाकाराने निराधार लोकांना कागदोपत्री मदत केली.असल्याचे पहायला मिळाले. अनेकांचा  जाण्यायेण्याचा खर्च स्वतः गाडी करून तहसील ठिकाणी नेले.

मीना जगदीश आरमुरवार यांच्या लक्षात आले होते की आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत गावात बरेच असे आधार नसलेली लोकांची संख्या आहे. त्या लोकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी आर्थिक त्रास होत आहे. अनेक जन संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निराधार योजने पासून वंचित आहेत. या सर्वांना शासकीय योजनेचा लाभ मिळायला हवा. अनेक वयोवृद्ध व अपंग, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजने अंतर्गत दर महिना एक हजार ते बाराशे रुपय मिळतात.

महागाईच्या काळात ही आर्थिक मदत पुरेशी नसली तरी वयोवृद्ध, अपंग, विधवा महिलांना हा मोठा आधार आहे. परंतु अनेक जाचक अटींमुळे लाभार्थी या योजनांपासून वंचित आहेत. ते वंचित राहू नये म्हणून मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी गावातील निराधार लोकांना स्व खर्चाने स्व पुढाकाराने तालुक्याच्या ठिकाणी नेऊन सहकार्य केले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सूद्धा परीश्रम घेतले असल्याचे पहायला मिळाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर