ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रोही व रानडुक्कर करत आहे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान ..

116 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

#वाघाच्या दशहतीतही करावी लागते जागली..
# शेतक-यांना वनविभाकडून मिळणाऱ्या झटका मशिन कधी मिळणार….

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की…
झरी:-तालुक्यात अल्य व अत्यल्प शेतकरी जास्त प्रमाणात असून कोरडा तर कधी ओला दुष्काळ सतत नापिकी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे . जंगली भाग रानटी जनावरे संपूर्ण पिक फस्त करत आहे. लावलेला खर्च निघत नाही . कुंटुबाचा खर्च आरोग्य, मुला बाळांचे शिक्षण बँकेचे कर्ज भरण कठीण होत चालले आहे .

मुकुटबन व झरी असे दोन वन विभाग असून सुमारे दोन हजार हेक्टर जंगल क्षेत्र आहे .या जंगलात वाघ , लांडगा कोल्हा या हिस्त्र प्राण्या बरोबर रोही रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहे .डोंगरगाव, चिंचघाट पवनार , आडकोली , मांडवा , वडगाव , जुनोनी ,पाचपोर, बंदी बाढोणा ,शेकापूर ,खापरी ,इत्यादी जंगलालगतच्या शिवारातील शेतीचे विशेषत: रोही व रानडुक्कर पेरणी पासूनच तर काढणी पर्यत सर्वात जास्त नुकसान करतात .या परिसरातील लोकांना वाघाची दहशत असतांना पावसाळ्यात ,थंडीत रात्र दिवस पिकांची राखण करावी लागत आहे

. प्राण्याचा बंदोबस्तासाठी या भागातील शेतकऱ्यांनी जंगलाला जाळीचे कुपन करण्याची मागणी अनेकदा शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे .
जंगला जवळील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपयोजना म्हणून वनविभागाकडून शेतकऱ्यांना ‘ झटका मशिन ‘ ५० % रक्कम घेऊन ही माशिन देण्यात येतात . पिकाच्या सभोवताल बारीक तार लावून त्यातून बॅटरी मशिनीतून प्रवाह चालू करण्यात येतो . त्या तारेला स्पर्श होताच प्राण्याला विदूत प्रमाणे बॅटरीचा झटका लागतो त्यामुळे प्राणी शेतात प्रवेश करत नाही . याने वन्य प्राण्यांना इजा पण होत नाही व पिकांचे रक्षण होते .
परंतु मुकूटबन वन विभागाने मात्र पवनार येथील केवळ १० शेतकऱ्यांना या माशिनचे वाटप करण्यात आले आहे . बरेच शेतकरी प्रतीक्षेत असून कृती आराखडा तयार केल्या नंतरच उर्वरीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार असाल्याचे सांगण्यात आले आहे .
एकही पिक जंगली जनावरांच्या तावडीतून सुटत नाही आता तुरीचे पिक निघाले आहेत परंतु चना काढणीस तयार झाला असुन वाळलेल्या चण्यावर रान डुकराचा जास्त जोर आहे.हाता तोंडाशी आलेले पिक एका रातून उद्वस्त करत आहे . वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली जात असतांना मात्र वन विभाग शेतकऱ्यांच्या मागणी कडे फार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर