ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दोन्ही मार्की गावाला जोडणारा पुल धोकादायक

188 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

स्कूल बस बंद होण्याच्या मार्गावर

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,

पुराच्या पाण्यामुळे मार्की खु ते मार्की बु.या रोडवरील पुलावर कॉक्रीट वाहून गेले असून त्यावर अनेक खड्डे पडले आहे.या मार्गाने जाणाऱ्या लोकांना फुला वरून मार्ग काढणे कठीण झालेआहे.

मार्की खु ते मार्की  बु.या दोन्ही गावांत २ किमी चे अंतर आहे मधात एका नाला असून १० वर्षापूर्वी त्यावर पुलाचे बांधकाम करण्यात होते.भष्ट्र अधिकारी यांच्या आशिर्वादाने कच्चे बांधकाम करण्यात आल्याने संपूर्ण फुल खिडखीडे झाला आहे.या वर्षी मे महिन्यात या रोडच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.परंतु पुलाची डागडुजी करणे आवश्यक होते मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

सध्या सतत पाऊस सुरू असून पुराचा जोर वाढला आहे.पुराच्या पाण्यामुळे मधोमध चार फूट लांब रुंदीचे खड्डे पडले असून सिमेंट पाइप उघडे पडले आहेत.पुलावर पाणी वाहत असताना खड्डाचा अंदाज येत नाही.दुचाकी व चारचाकी वाहन खड्डयात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

अनेक शेतकऱ्यांना रोड महत्वाचा असून रासायनिक खते,शेती उपयोगी साहित्य,बैलगाडी टाकून नेतांना बैलांच्या पायांना इजा झाल्या आहेत.शिक्षणासाठी मार्की बु.येथे ३० ते ४० विद्यार्थी ये-जा करतात,मुकुटबन येथिल खाजगी शाळेची  बस दररोज विद्यार्थ्यांची ने आण करत असून ती आता बंद होण्याची शक्यता आहे.सरकारी शाळेत शिक्षक नाही तर खाजगी शाळेत जायला रस्ता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर