ब्रेकिंग न्यूज
⚡ 3 नव्हे चौघे करणार होते टायगर श्रॉफवर हल्ला, आदल्या दिवशी झाला मोठा कांड, चौथा हल्लेखोर कुठे गायब? ✦ ⚡ पत्रकार भैय्याजी कनाके यांना मातृशोक; प्रभाताई कनाके यांचे निधन ✦ ⚡ दसरा व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च! ✦ ⚡ Badlapur News: बदलापूर हादरलं! शिवसेना संपर्क कार्यालयाबाहेर तरुणावर सपासप वार, मध्यरात्री नेमकं काय घडलं?… ✦ ⚡ किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ ✦ ⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ रब्बी हंगामासाठी पाणी हवेय? शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक, अन्यथा पिकांना बसू शकतो फटका ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय
SP News Maregaon

लंडनमध्ये शिक्षणाचे स्वप्न होणार साकार!:हिंदुजा फाऊंडेशनकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी ‘मेडटेक’ शिष्यवृत्तीची घोषणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सामाजिक उपक्रम राबवणारी हिंदुजा ग्रुपची परोपकारी शाखा हिंदुजा फाऊंडेशनने, किंग्ज कॉलेज लंडन येथे मेडटेक इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप या विषयात मास्टर्स करण्याची इच्छा असणाऱ्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांसाठी 2026 मधील शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. 2024 मध्ये हिंदुजा फाऊंडेशन यूकेने हिंदुजा किंग्ज हेल्थ पार्टनर्स अकादमीची स्थापना करण्यासाठी जगप्रसिद्ध किंग्ज कॉलेज लंडनला महत्त्वपूर्ण देणगी दिली. या अभूतपूर्व भागीदारीमध्ये स्कूल ऑफ बायोमेडिकल इंजिनिअरिंग अँड इमेजिंग सायन्सेस येथे आरोग्यसेवा तंत्रज्ञानातील संपूर्ण चार वर्षांच्या पीएचडी स्टुडंटशिपचा आणि एक वर्षाच्या एमएससीचा समावेश आहे. मेडटेक इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिपमुळे यूके आणि भारत या दोन्ही देशांतील आरोग्यसेवा समुदायांना फायदा होईल. याव्यतिरिक्त, या भागीदारीमुळे गायज अँड सेंट थॉमस हॉस्पिटल्स एनएचएस फाऊंडेशन ट्रस्टद्वारे प्रदान केले जाणारे नर्सेस प्रशिक्षण, ऑब्झर्व्हरशिप आणि ऑनलाइन नेतृत्व प्रशिक्षण अभ्यासक्रम मुंबईतील पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले आहेत. पीएचडी तसेच एमएससी करणाऱ्या अनुक्रमे तीन आणि दोन हिंदूजा स्कॉलर्सनी ऑक्टोबर 2025मध्ये किंग्ज कॉलेज लंडन येथे आपल्या अभ्यासाला सुरुवात केली, तर एका पीएचडी अभ्यासकाने फेब्रुवारी 2026मध्ये प्रवेश घेतला. ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या आगामी 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी, चार पीएचडी आणि पाच एमएससी शिष्यवृत्तींसाठी अजूनही अर्ज स्वीकारले जात आहेत. हिंदूजा फाउंडेशन यूकेच्या पीएचडी शिष्यवृत्तींविषयी अधिक तपशील आणि अर्ज कसा करावा यासंबंधीच्या सूचना येथे उपलब्ध आहेत: Hinduja Scholars – Surgery CDT. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मे 2026 आहे. दरम्यान, एमएससी मेडटेक इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप अभ्यासक्रमासाठी पाच शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत – भारतीय नागरिकांसाठी एक 80% आणि 50% साठी चार शिष्यवृत्ती आहेत. यासंबंधीची अधिक माहिती हिंदुजा स्कॉलरशिप फॉर मेडटेक इनोव्हेशन सी आंत्रप्रेन्युअरशिप एमएससी | किंग्स कॉलेज लंडन या लिंकवर उपलब्ध आहे; तसेच अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 19 जून 2026 ही आहे. या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे उत्तम ज्ञान, आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि नावीन्यावर आधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. यामुळे, शिक्षणातील तसेच संशोधनातील उत्कृष्टतेसाठी ख्याती पावलेल्या किंग्ज कॉलेज लंडनमध्ये राहून, त्यांना आरोग्यसेवेतील अत्यंत महत्त्वाच्या क्लिनिकल ​​गरजांची पूर्तता करणे आणि भारत तसेच जागतिक स्तरावरील आरोग्यसेवेच्या भविष्यात योगदान देणे शक्य होईल. प्रभावी संशोधन, उत्कृष्ट शिक्षण आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून केवळ युकेमध्येच नव्हे, तर जागतिक स्तरावरही सकारात्मक आणि शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी हे महाविद्यालय प्रयत्नशील आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर