ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

कर्तव्यदक्ष अधिकारी प्रवीण सुळे यांची एपीआय पदावर पदोन्नती

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगावातून अमरावती परिक्षेत्रात बदली; जनतेतून अभिनंदनाचा वर्षाव

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर पदोन्नती होऊन अमरावती परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे मारेगाव तालुक्यात नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जून 2025 मध्ये मारेगाव येथे रुजू झाल्यानंतर प्रवीण सुळे यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण केले. शाळा व महाविद्यालयांना भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, वाहतूक नियम, व्यसनमुक्ती, कायद्याचे महत्त्व आणि करिअर मार्गदर्शन याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.

त्यांच्या संवादशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावत त्यांनी तपास कौशल्याची वेगळी छाप उमटवली. निष्पक्ष चौकशी, कायद्याच्या चौकटीत निर्णय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देणारा अधिकारी म्हणून त्यांनी अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली.

कोणताही पक्षपात न करता न्याय देण्याच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास वाढला होता.सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत केला.

शांत, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी मारेगावकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.त्यांच्या पदोन्नतीनंतर तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, नागरिक व सहकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, “कर्तव्य आणि माणुसकीचा समतोल राखणारा अधिकारी” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर