ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अंगावर रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी:4 वर्षांचा ओम 45 टक्के भाजला; नागपुरातील घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


होळीच्या उत्साहाला नागपूरमध्ये एका घटनेमुळे गालबोट लागले आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडवला या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या 4 वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची खळबळजनक घटना कोराडी परिसरात घडली आहे. यात चिमुकला 45 टक्के भाजला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी येथील रहिवासी 4 वर्षीय ओम हरीश वांगे हा घराबाहेर पिचकारीने होळी खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे नेत होत्या. ओम खेळत असताना त्याने सहजपणे पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. यामुळे सिंधू ठाकरे यांचा संयम सुटला आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट नातवाच्या अंगावर रिकामी केली. 45 टक्के भाजला, प्रकृती गंभीर गरम पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने विव्हळू लागला. पाण्याचा चटका इतका तीव्र होता की, त्याचा कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजला आहे. मुलाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्य बाहेर धावून आले. जखमी ओमला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, तो सुमारे 45 टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. ओमचे वडील वेकोलीमध्ये कार्यरत आहेत. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल ही हृदयद्रावक घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रागाच्या भरात पाणी ओतल्यानंतर आजीने पुन्हा नातीच्या हातातील थंड पाण्याची बादली घेऊन ती ओमवर ओतली. मात्र, तोपर्यंत ओम गंभीर भाजला गेला होता. पोलिस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हायरल सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आपल्याच नातवाबाबत आजीने दाखवलेल्या या क्रूरतेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर