ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सोशल मीडियाच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी हवी “मोबाइल पार्किंग’:शिक्षण विभागाच्या सहाय्यक उपसंचालक ज्योती परिहार यांचे पालकांना आवाहन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सध्या सोशल मीडियावर बहुमूल्य असणारा वेळ खर्च होत असून वाढत्या गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे घरासमोर वाहने लावण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था करतो अगदी तशाप्रकारे आपल्या घराच्या आतमध्ये देखील मोबाइल पार्किंगची सुविधा करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पुणे शिक्षण विभागाच्या सहाय्यक उपसंचालक ज्योती परिहार यांनी केले. शहरातील तिलोक जैन विद्यालय येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी परिहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी बाबुराव जाधव, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, संस्थेचे सचिव सतीश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, प्राचार्य अजय भंडारी आदी उपस्थित होते. परिहार म्हणाल्या, पालकांनी मुलांवर अपेक्षांचे फार ओझे देण्यापेक्षा जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यावर कुठल्याही संकटावर मात करून सहजपणे त्यातून मार्ग काढून यशस्वी जीवन जगू शकतो अशा पद्धतीने त्यावर संस्कार व्हायला हवेत. अनेक विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून देखील कधीकधी आयुष्याच्या परीक्षेत नापास होतात. यामुळे फक्त गुणांकडे लक्ष न देता त्याच्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे. अभ्यास महत्त्वाचा आहे मात्र त्याबरोबरच जवळपासची माणसे देखील वाचता आली पाहिजेत. यामुळे जीवन जगताना आर्थिक, मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठलीही हानी होत नाही. संस्थेचे सचिव सतीश गुगळे म्हणाले, या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संस्थेवर विश्वास दाखवून निवड केली याबद्दल आभार मानतो. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जागतिक घडामोडीत या संस्थेतील विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही, जगाच्या बरोबरीने अथवा एक पाऊल पुढे येथील प्रत्येक विद्यार्थ्याचा राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगत पालक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल पानखडे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक सातपुते यांनी केले तर आभार भारत गाडेकर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर