ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य गोदाम बघितले नसल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने हरभरा ठेवण्यासाठी खाजगी गोदामा भाड्याने घेतले आहे. या गोदामात सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला असून सदर हरभरा नाफेड मार्फत खरेदी करण्यात आला आहे. शनिवारी ता. १३ झालेल्या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे गोदामावरील टीनपत्रे उडून गेली त्यामुळे गोदामातील हरभरा पिकाचे पोते भिजून गेले आहेत. दरम्यान, सदर गोदाम भाडेतत्वावर घेतांना कुठलेही निकष पाळण्यात आले नसल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. त्यामुळेच हरभऱ्याचे पिक भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकरी व नागरीकांचे म्हणणे आहे. याघटनेनंतर खडबडून जागे झालेल्या वखार महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंगोलीत येऊन पाहणी केली आहे. या शिवाय नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी विमा कंपनीला कळविण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून अधिकारी हिंगोलीत ठाण मांडून बसले असून गोदामातील हरभरा सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. आता विमा कंपनीकडून सर्वेक्षण केल्यानंतरच नेमके किती नुकसान झाले याचा थेट आकडा मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही – निलेश लांडे, विभागीय व्यवस्थापक वखार महामंडळ या परिसरात शनिवारी मोठ्या प्रमाणावर वादळी वारा होता. यामध्ये गोदामाचे टीनपत्रे उडालीच शिवाय त्यासाठी आधारासाठी बसविण्यात आलेले लोंखंडी अँगल तुटले आहे. गोदाम भाडेतत्वावर घेतांना सर्व निकष पाळण्यात आले आहेत. हरभरा पिकासाठी नवीन बारदाणा असल्याने जास्त नुकसान झाले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही तर शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार काम केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर