ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो:शिवसेना पदाधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता कमालीचे राजकीय वळण मिळाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माळशिरस तालुक्याचे पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी “अजितदादांप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचाही घात होऊ शकतो,” असे अत्यंत खळबळजनक वक्तव्य केल्याने महायुतीसह संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे अधिकृत पदाधिकारी असूनही दत्तात्रय मगर यांनी थेट आपल्याच सरकारमधील मित्रपक्षांवर संशय व्यक्त केला आहे. आंदोलनस्थळी बोलताना मगर म्हणाले, “मी सध्या सत्ताधारी सरकारमध्ये आहे, हे मान्य आहे. पण अजितदादांसोबत काय झाले, हे आज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. शेतकऱ्यांचा एक मोठा कैवारी असणारे अजित पवार आपल्यामधून कसे हिरावले गेले, हे सर्वांनी पाहिले आहे. आता आपल्याला या दुसऱ्या कैवाऱ्याला (रोहित पवार) जपायचे आहे. मला सर्वात मोठी खंत वाटते ती म्हणजे आपले नेते एकनाथ शिंदे साहेबांची! अजितदादा जसे गेले, तसेच शिंदे साहेबांचाही अंतर्गत राजकीय घातपात केला जाऊ शकतो, अशी दाट शक्यता मला वाटतेय.” सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत आणि राजकीय भविष्याबद्दल थेट जाहीर मंचावरून अशी शंका उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. रोहित पवारांच्या आंदोलनाला दत्तात्रय मगर यांचा पाठिंबा दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, यामध्ये एक अट घालण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन लाखांवरील उर्वरित सर्व रक्कम आधी बँक खात्यात एकरकमी भरावी लागणार आहे, तरच त्यांना सरकारच्या दोन लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरकारने लावलेली ही जाचक अट तातडीने रद्द करावी आणि शेतकऱ्यांना थेट दिलासा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी रोहित पवार पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पदाधिकारी आणि माळशिरस तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी थेट रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी जाऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या एका मोठ्या विधानामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर