ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

उदयनराजे अन् मीच अंपायर, शिवेंद्रसिंहराजेंची नगरसेवकांना थेट कानउघाडणी:साताऱ्यात क्रिकेटपेक्षा राजेंच्या वक्तव्याचीच जास्त चर्चा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


साताऱ्यात क्रिकेट आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानात उतरून जोरदार फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मात्र, त्यांच्या खेळीपेक्षाही त्यांच्या राजकीय शैलीतील वक्तव्यांचीच अधिक चर्चा रंगली. खासदार उदयनराजे भोसले आणि आपण अंपायर असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवकांना मिश्किल शब्दांत कानपिचक्या दिल्या. उदयनराजे आणि मी अंपायर आहोत. कोण कच्चा लिंबू, कोण आऊट आणि कोण नॉट आऊट हे आम्हीच ठरवणार, असे वक्तव्य करत शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. साताऱ्यातील राजकारणात आपल्या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे शिवेंद्रसिंहराजे क्रिकेटच्या मैदानावरही त्याच अंदाजात दिसले. त्यांच्या वक्तव्याला कार्यकर्ते आणि क्रिकेटप्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला. काही दिवसांपूर्वी सातारा नगरपालिकेत नगर विकास आघाडी आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजेंनी नगरसेवकांना एकत्र येण्याचा सल्लाही दिला. तुम्ही आता वेगवेगळ्या आघाड्यांचे नगरसेवक नसून भाजपचे नगरसेवक आहात. जुन्या आघाड्यांचे राजकारण विसरा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. पुढील काही दिवसांत सर्व नगरसेवकांची एकत्रित क्रिकेट मॅच आयोजित करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली. खेळाडू मिक्स करा, जुन्या गटांप्रमाणे सामने नकोत, असे सांगत त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा संदेश दिला. मैदानाबाहेर वाद नकोत, मैत्रीपूर्ण स्पर्धा व्हावी शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, आम्ही दोघेही मैदानावर येऊ, अंपायर म्हणून बसू आणि गल्लीतल्या क्रिकेटसारखे कोण आऊट, कोण नॉट आऊट हे ठरवू. मैदानाबाहेर वाद नकोत, पण मैदानात मैत्रीपूर्ण स्पर्धा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून क्रिकेटच्या निमित्ताने दिलेला हा राजकीय संदेश आता चांगलाच गाजत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर