ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंबईत भाजपला रोखण्यासाठी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी:संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन; ठाकरे-राज युतीही अंतिम टप्प्यात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे दिसत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, ही ठाकरे गटाची मुख्य भूमिका आहे. काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास भाजपचा पराभव करणे सोपे जाईल, असे मत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याकडे मांडले आहे. भाजपला रोखण्यासाठी आपण एकत्र लढूया, असे आवाहन राऊत यांनी या संवादादरम्यान केल्याचे माहिती आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार? एकीकडे काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुंबईच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याचे संकेत मिळत असून, आज किंवा उद्या या दोन पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा या नव्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांचा पक्ष ठाकरे बंधूंसोबत महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. जर काँग्रेसनेही या आघाडीला साथ दिली, तर मुंबईत भाजपविरुद्ध ‘महाविकास आघाडी’ अधिक प्रबळ होण्याची चिन्हे आहेत. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्वसमावेशक आघाडीचा पवित्रा घेतला आहे. आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या प्रस्तावावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर