ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांचा थरार!:’यांना गोळ्या घाला’ म्हणत FDA अधिकाऱ्यांच्या अंगावर घातली भरधाव गाडी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज नजीकच्या रहीमपूर येथे गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकावर माफियांनी थेट जीवघेणा हल्ला केला. महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढेच नव्हे तर, अधिकाऱ्यांना दहशत दाखवून आणि धमकावून आरोपींनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक त्यांच्यादेखत पळवून नेला. या संपूर्ण थराराचा व्हिडिओ आता उघडकीस आला असून, या घटनेमुळे पोलिस दल आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आदेशांनंतर, पथकाने मंगळवारी (9 जून) पहाटे रहीमपूर परिसरात हा सापळा रचला होता. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका आयशर ट्रकची तपासणी केली असता, त्यात तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला सापडला. हा कोट्यवधींचा माल जप्त करून अधिकारी पोलिस संरक्षणाची वाट पाहत असतानाच, अचानक एका विनानंबरच्या काळ्या स्कॉर्पिओमधून 5 ते 6 गुंड तिथे धडकले. त्यांनी गाडीतून उतरताच अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि ‘यांना गोळ्या घाला’ अशा आरोळ्या ठोकत थेट हल्ला चढवला. महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना गाडीने चिरडण्याचा प्रयत्न या भयंकर घटनेत माफियांनी विशेषतः महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केले. त्यांना चिरडण्याच्या उद्देशाने एका आरोपीने भरधाव गाडी थेट त्यांच्या अंगावर घातली आणि त्यांचा पाठलागही केला. मात्र, सुरसे यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून वेळीच बाजूला उडी मारल्याने त्या या जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. याच प्रचंड गोंधळाचा आणि दहशतीचा गैरफायदा घेत माफियांच्या इतर साथीदारांनी कारवाईसाठी जप्त केलेला गुटख्याने भरलेला तो आयशर ट्रक घटनास्थळावरून वेगाने पळवून नेला. वाळूज पोलिसांच्या कारवाईत दोघे अटकेत सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या या उघड आणि भयंकर हल्ल्याची गंभीर दखल घेत पोलीस यंत्रणा तातडीने खडबडून जागी झाली आहे. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे आणि अधिकाऱ्यांना धमकावणे यांसारख्या अत्यंत गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तत्काळ आणि आक्रमक पावले उचलत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर पळवून नेलेला तो ट्रक आणि मुख्य फरार आरोपींचा कसून शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध दिशांनी रवाना करण्यात आली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर