ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

पॉस मशीनद्वारे विक्री असूनही बार्शीत युरियाचा मेळ बसेना:शेतकरी हैराण, पारदर्शकतेला युरिया, डीएपी खतांच्या कृत्रिम तुटवड्यापुढे कृषी विभाग हतबल‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खत दुकानात पॉस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणाद्वारे खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली. खत विक्रीचे डिजीटली ट्रॅकींग होत असल्याने दुकानातील खतांचा साठा समजणे सोपे झाले आहे. परंतु, बार्शी तालुका मात्र याला अपवाद असल्याचे दिसून येत आहे. युरिया, डीएपी (१८:४६:००) या खतांचा बार्शी तालुक्यात आजअखेर किती साठा आहे याची माहिती देण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. सन २०१८ पासून डीबीटी प्रणाल सर्वत्र टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली. खतांच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत किरकोळ विक्रेत्यांनी लाभार्थींना केलेल्या प्रत्यक्ष विक्रीच्या आधारावर, विविध खत श्रेणींवरील अनुदान खत कंपन्यांना दिले जाते. सर्व अनुदानित खतांची शेतकऱ्यांना- खरेदीदारांना विक्री प्रत्येक किरकोळ विक्रेत्याच्या दुकानात लावलेल्या विक्री केंद्र पॉस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणामार्फत केली जाते. लाभार्थींची ओळख आधार कार्ड आदी कागदपत्राच्या आधारे पटवली जाते. ^माझ्याकडे वैराग भाग आहे. बार्शी शहरांचा भाग विलास मिस्कीन यांच्याकडे आहे. स्टॉक दिसत असला तरी तो ऑनलाईन कमी झालेला नाही. इंटरनेटच्या असुविधेमुळे मशीन चालत नाहीत. अशी कारणे दुकानदारांकडून मिळत आहेत. सध्या स्टॉक नाही. दोन दिवसांत मिळून जाईल. – किशोर अंधारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, बार्शी. आधार-सक्षम खत वितरण प्रणाली अंतर्गत, किरकोळ विक्रेत्यांना पॉस उपकरणांद्वारे अनुदानित खते विकणे अनिवार्य आहे. वेब-आधारित एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणाली द्वारे खतांच्या विक्रीवर ऑनलाइन देखरेख ठेवली जाते. अनुदानाचा गैरवापर थांबविणे, खत विक्रीचे डिजिटल ट्रॅकिंग करणे, काळाबाजार आणि पळवाट रोखणे, आधारच्या आधारे शेतकऱ्यांची ओळख पडताळणी करणे असा यामागचा हेतू आहे. पूर्वी खत कंपनीला अनुदान माल गोदामात पोहोचल्यानंतर मिळत असे. आता पॉस उपकरणाद्वारे शेतकऱ्याला विक्री नोंदवल्यानंतरच कंपनीला अनुदान दिले जाते. बार्शीत मात्र पॉस मशीनद्वारे अनुदानित खतांची विक्री होत असतानाही आजघडीला कोणत्या प्रकारचे किती खत उपलब्ध आहे ? याची अद्ययावत आकडेवारी कृषी विभागाकडे नाही. युरिया, डीएपी खतांचा मागील अनेक दिवसांपासून तुटवडा आहे. शंकर गायकवाड, प्रदेशाध्यक्ष(शे. सं) खत खरेदी नंतर शेतकऱ्यांना ओटीपी आल्यानंतर व्यवहार पॉसच्या माध्यमातून साधारणत: २२ प्रकारची रासायनिक अनुदानित खते विकली जातात. अनुदानित खतांची विक्री करताना कोणत्याही शेतकऱ्याला पॉस उपकरणाशिवाय खतांची विक्री केली जात नाही. ही उपकरणे आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आलेली आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला खत हवे असल्यास पॉस उपकरणात केवळ आधार क्रमांक नमूद केला तरी खत मिळते. क्रमांक नमूद करताच संबंधित शेतकऱ्याच्या भ्रमणध्वनीवर ओटीपी वन टाईम पासवर्ड पाठविला जातो. तो पॉॅसमध्ये नमूद केल्यानंतरच व्यवहार होतो. त्यामुळे आता शेतकऱ्याची संमती असल्याशिवाय त्याच्या नावे कोणालाही खताची खरेदी करता येत नाही. इतकी पारदर्शकता आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे. आधार लिंकिंगव्दारे शेतकऱ्यांचे डिजिटल ट्रॅकिंग मशीन चालत नाहीत खत खरेदी नंतर शेतकऱ्यांना ओटीपी, आधार क्रमांक नमूद

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर