ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल…
SP News Maregaon

Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : रविवारी घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त आज म्हणजेच रविवारी आणि सोमवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे वाहतूक बदल करण्यात आले असून वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी नागरिकांना केलं आहे.

पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी मॉल ते हॉटेल ब्लू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर आणि ब्लू नाईल चौक येथे आपली वाहने लावावीत.

दोन दिवस ‘नो-पार्किंग’ असणारे प्रमुख मार्ग

लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी (मुंढवा) या रस्त्यावर दोन्ही दिवस सर्व प्रकारची वाहने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासोबतच इतर काही भागांतही पार्किंगला मनाई असेल. यात कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरियल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळेजवळील खुडे चौक, संगमवाडी ते येरवड्यातील शाहदावलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता आणि ५०९ चौक ते लोहगाव हवाई दलाचा तळ याचा समावेश आहे.

सोमवारचे विशेष वाहतूक बदल

अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल आणि भरत नाट्य मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई असेल. तसेच, सकाळी ७ वाजल्यानंतर किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हॉटेल ब्लू नाईल चौकात जावे आणि तेथून पुढे आपल्या इच्छितस्थळी प्रस्थान करावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर