बातमी ऐका (Marathi Voice Reader)
IND vs NZ 5th ODI Rohit Sharma Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाची परिस्थिती आणखी बिकट झाल्याचं पहायला मिळतंय. न्यूझीलंडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला अन् टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर आता टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळल्याचं पहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली न्यूझीलंडमधील आपल्या करियरच्या दौऱ्यात फेल गेल्याचं पहायला मिळालं आहे.
टीम इंडिया 34 वर 3 आऊट
आगामी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्ती घेऊ शकतात. त्यामुळे दोन्ही स्टार खेळाडूंसाठी हा न्यूझीलंडचा शेवटचा दौरा होता. अशातच या दौऱ्यातील शेवटच्या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्वस्तात माघारी जावं लागलं. रोहित शर्मा सात रन्स करून तर विराट कोहली पाच रन्स करून आऊट झाला. तर सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने 18 रन्स केले. त्यामुळे टीम इंडियाची परिस्थिती 34 वर 3 अशी झाली होती.
ROHIT SHARMA WICKET
#NZvIND https://t.co/AawrsGkeO8
— cricket live (@rohitsharma8955) November 15, 2026
न्यूझीलंडमध्ये विराट अन् रोहितचा शेवटचा सामना?
रोहित शर्मा याने चांगली सुरूवात करून दिली होती. परंतू रोहित पुन्हा खाली राहण्याऱ्या बॉलवर आऊट झाला. रोहितचा शेवटचा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि मुलंही आली होती. परंतू रोहित शर्माला त्यांच्यासमोर मोठा स्कोर उभा करता आला नाही. त्यामुळे रितीका देखील नाराज झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता टीम इंडियाला आता कॅप्टन श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी सावरलं असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा टीम इंडियाच्या 68 धावा झाल्या आहेत.
गंभीरने दिली होती वॉर्निंग
गौतम गंभीरने मॅचच्या आधी घेतलेल्या प्रेस कॉन्फरेन्समध्ये स्पष्ट मत मांडलं होतं. न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाच्या बॅटिंगचा मुद्दा आहे. बॅटर्सने पहिल्या 15 ओव्हर टिकून खेळल्या पाहिजेत, असं गंभीर म्हणाला होता. पण टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. गंभीरची वॉर्निंग रोहित विराट अन् ऋतुराजने गांभिर्याने घेतली नाही का? असा सवाल देखील विचारला जातोय.
Virat Kohli in the India vs New Zealand ODI series:
1st ODI – 74(51)
2nd ODI – 7(7)
3rd ODI – Abandoned
4th ODI – 0(4)
5th ODI – 5(7) https://t.co/ePypYRE5Xo
— VARAHA WARRIOR (@VarahaWarrior) November 15, 2026
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (C), इशान किशन (WK), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यश ठाकूर.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, टिम सायफर्ट (WK), निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (C), ख्रिस्टियन क्लार्क, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.