ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शरद पवार यांची प्रकृती स्थिर:रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज, चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर, आज पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून ते पुढील काही दिवस मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. रुबी हॉल क्लिनिकचे चेअरमन आणि प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रांट यांनी पवारांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितले की, पवारांच्या रक्ताच्या चाचण्या आणि सीटी स्कॅनचे सर्व अहवाल सामान्य आहेत. उलट्यांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते, मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.
रुग्णालयातून बाहेर पडताना शरद पवार यांनी सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांना अभिवादन केले. शरद पवारांना थकवा जाणवत असल्यामुळे आणि काही नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली विविध चाचण्या पार पडल्या. या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट समाधानकारक आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सततचे दौरे आणि कामाच्या व्यापाचा प्रकृतीवर ताण येऊ नये, म्हणून डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. विल्सन मणियार यांनी व्यक्त केला विश्वास शरद पवार यांच्या प्रकृतीची बातमी समजताच राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
रुग्णालयातून बाहेर पडतानाचे त्यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार आणि मित्र विठ्ठल मणियार होते. शरद पवार यांचे जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी सांगितले की, पवारसाहेब यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले. सर्व डॉक्टरांनी त्यांची काळजी घेतली त्यामुळे घरी जाताना त्यांनी सर्वांना अभिवादन केलं. साहेब बरे झाले की लगेच कामाला लागतात. काम आणि माणसं त्यांची विल पावर आहे.’ दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही छातीत संसर्ग आणि श्वास घेण्यात त्रास यामुळे त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 14 फेब्रुवारीला डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा अशक्तपणा आणि उलट्यांचा त्रास जाणवल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविवारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर