ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल…
SP News Maregaon

Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा: इंडियन बँकेच्या कराड शाखेतील मॅनेजरने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली. कराड तालुक्यातील आगाशिवनगर- मलकापूर येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. रविकिरण केशव लाडे (मूळ रा. मुरुड, ता. जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजी व मराठी भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांनी सापडली असून उपक्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत म्हटलं आहे. याप्रकरणी बंधू अक्षय केशव लाडे (वय ३२) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविकिरण लाडे हे इंडियन बँकेच्या कराड येथील शाखेत मॅनेजर या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर आगाशिवनगर येथील ओम रेसिडेन्सीमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी राहत्या फ्लॅटमध्येच गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली असता एक चिठ्ठी आढळली.

लग्नाचे आश्वासन देऊन दीर्घकाळ संबंध म्हणजे अत्याचार नव्हे, हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण

चिठ्ठीत नेमकं काय?

बँक मॅनेजर रविकिरण लाडे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. मराठी आणि इंग्रजी भाषेत ही चिठ्ठी लिहिलेली असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. उपक्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत वारंवार अपमान करत होते, असंही चिठ्ठीत म्हटलं आहे. या घटनेनंतर बँकिंग क्षेत्रातील कामाचा वाढता ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कथित छळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अकरा वर्षांपासून नोकरी

रविकिरण लाडे यांच्या पश्चात आई, वडील, बायको, सात वर्षांची मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणी असा परिवार आहे. नोव्हेंबर २०२४ पासून इंडियन बँक शाखा कराड येथे ते मॅनेजर म्हणून कार्यरत होते. गेल्या अकरा वर्षांपासून ते नोकरीला होते.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर