ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल…
SP News Maregaon

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य नियोजनाची जोड दिली, तर कमी खर्चात मोठे उत्पन्न मिळवता येते. हे सांगोला तालुक्यातील महूद येथील प्रगतिशील शेतकरी समाधान बाळासो सरक यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या डाळिंबाच्या बागेत हिरव्या वांग्याचे आंतरपीक घेऊन अवघ्या तीन महिन्यांत खर्च वजा जाता 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

समाधान सरक यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या तीन एकर डाळिंब बागेत आंतरपीक म्हणून स्थानिक आणि लोकप्रिय असलेल्या सांगोला वाणाच्या हिरव्या वांग्याची लागवड केली होती. लागवडीपूर्वी त्यांनी जमिनीची चांगली मशागत करून त्यात भरपूर शेणखत मिसळले. त्यानंतर गादीवाफे (बेड) तयार करून त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन केले आणि रोपांची लागवड केली. या संपूर्ण लागवडीसाठी त्यांना सुमारे 30 हजार रुपये खर्च आला.

वांग्याच्या पिकावर प्रामुख्याने थ्रीप्स, भुरी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी सरक दर चार दिवसांनी नियमितपणे आवश्यक औषधांची फवारणी करतात. योग्य व्यवस्थापनामुळे पीक जोमदार आले असून, आतापर्यंत वांग्याचे चार तोडे पूर्ण झाले आहेत.

उत्पादित झालेल्या दर्जेदार वांग्याची विक्री सांगोला येथील बाजारपेठेत केली जात आहे. सध्या बाजारपेठेत या हिरव्या वांग्याला प्रति कॅरेट 1100 रुपये असा चांगला दर मिळत आहे. सुरुवातीचा 30 हजार रुपयांचा खर्च वजा करता, त्यांना आतापर्यंत तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे, या वांग्याचे तोडे पुढील सहा महिने सुरू राहणार असल्याने आगामी काळात या उत्पन्नात आणखी मोठी भर पडणार आहे. सरक यांच्या या यशस्वी प्रयोगाचे परिसरातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर