ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई: मायानगरी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणरायाच्या दर्शनाला लाखो लोक बाहेर पडतात. विशेष म्हणजे गणपती विसर्जनाला मोठी गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या सोयीसाठी मध्यरेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या मुंबईकरांसाठी 22 विशेष उपनगरीय रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील मुख्य मार्गावर उत्सवातील शेवटच्या तीन दिवशी 18 फेऱ्या चालवण्यात येतील. तर विसर्जनाच्या दिवशी मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर चार फेऱ्या सोडण्यात येतील. त्यामुळे मध्यरात्रीनंतर देखील भाविकांना मुंबईतून ठाणे, कल्याण आणि पनवेलच्या दिशेने प्रवास करता येईल.

Weather Alert: पाऊस इज बॅक! महाराष्ट्रात धुमशान सुरू, रविवारी 24 जिल्ह्यांना अलर्ट

दरम्यान, 23, 24 आणि 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ ठाणेदरम्यान लोकल धावणार आहेत. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर देखील 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर विशेष लोकल फेऱ्यांची सुविधा आहे. या विशेष गाड्यांना मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

मुख्य मार्गावरील विशेष फेरी आणि वेळ

सीएसएमटी-कल्याण मध्यरात्री 1.40 वाजता

सीएसएमटी-ठाणे मध्यरात्री 2.30 वाजता.

सीएसएमटी – कल्याण मध्यरात्री 3.25 वाजता.

कल्याण-सीएसएमटी मध्यरात्री 00.05 वाजता

ठाणे-सीएसएमटी मध्यरात्री 1.00 वाजता

ठाणे – सीएसएमटी मध्यरात्री 2.00 वाजता

या सहा फेऱ्या प्रत्येकी तीन रात्री धावणार आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर एकूण 18 विशेष फेऱ्या होतील.

हार्बर मार्गावर विशेष फेऱ्या आणि वेळ (25-26 सप्टेंबर)

सीएसएमटी-पनवेल मध्यरात्री 1.30 वाजता

सीएसएमटी – पनवेल मध्यरात्री 2.45 वाजता

पनवेल – सीएसएमटी मध्यरात्री 1.00 वाजता

पनवेल – सीएसएमटी मध्यरात्री 1.45 वाजता.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर