ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मुंब्रा पोलिसांचे ‘मिशन 48 तास’, सलग 2 दिवस अहोरात्र मोहीम:सुगावा नसताना 948 सीसीटीव्ही फुटेज पाहून 6 पथकांनी लावला सातवर्षीय चिमुरडीचा शोध

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोणताही तांत्रिक पुरावा नाही, मोबाइल लोकेशन नाही की तपासाचा ठोस धागा नाही… अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत मुंब्रा पोलिसांनी केवळ ४८ तासांत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवले आहे. दिवा परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीचा पोलिसांनी बदलापूर येथे शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली. ठाणे ते बदलापूरदरम्यानच्या तब्बल ९४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. २८ मे रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास ही चिमुरडी राहत्या घराच्या परिसरातून अचानक गायब झाली होती. तिच्या वडिलांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे आणि एसीपी प्रिया डमाले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शोध आणि एनडीपीएसच्या ६ विशेष पथक व ५४ पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. पथकाने बदलापूर गाठून स्थानक परिसर आणि स्थानिक रिक्षाचालकांकडे चौकशी केली. अखेर सुमित शांताराम जाधव (३५) याची ओळख पटवून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला त्या वेळी त्याच्या तीन मुलांसोबत चिमुरडी खेळत असल्याचे दिसून आले. जाधव यांच्या मुलीच्या बाबतीत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. या मुलीसोबत गैरकृत्य होऊ नये म्हणून त्यांनी तिला घरी आणल्याचे पोलिसांना सांगितले. खेळायच्या व शिकण्याच्या चिमुरडीवर घर कामाचे ओझे खेळायच्या आणि शिकण्याच्या वयात ७ वर्षांच्या चिमुरडीवर घरातील कामे व लहान बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी लादली. याला मानसशास्त्रात बालपणाचे ‘पालकीकरण’ म्हणतात. पालकांच्या अज्ञानामुळे व सततच्या मारहाणीमुळे तिच्या मूलभूत ‘खेळण्याच्या अधिकारावर’ गदा आली. घरातून मिळणारा आनंद हिरावला गेल्यानेच तिने घर सोडले, ज्याचा गैरफायदा गुन्हेगारी पार्श्वभूमीमे इसम घेतात. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता तिच्या अशिक्षित पालकांचे समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना संवेदनशील बालसंगोपनाचे महत्त्व पटवून देणे, हाच या समस्येवरील खरा उपाय ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इनसाइट – पालकांकडून व्हायची मारहाण पोलिसांनी ७ वर्षीय चिमुरडीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, बालमन हेलावून टाकणारे वास्तव समोर आले. साक्षीचे आई-वडील अशिक्षित असून ते तिच्याकडून घरातील कामे करून घ्यायचे आणि लहान बहिणीला सांभाळण्याची सक्ती करायचे. खेळायला वेळ न मिळणे आणि आई-वडिलांकडून सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून या चिमुरडीने घर सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर