ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी 29 जूनपासून सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी केली. डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून विदर्भातील सध्याच्या हवामानाची परिस्थिती आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम अधोरेखित केला. लहान मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने उष्माघात, निर्जलीकरण, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा तसेच इतर उष्णताजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे थंड पाणी, सावलीची व्यवस्था किंवा उष्णतेपासून संरक्षणाची साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. हवामानातील बदल आणि विलंबाने होणारे पावसाचे आगमन यामुळे उष्णतेचा कालावधी अधिक लांबला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विदर्भातील शाळा 29 जून पासून सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे मान्य केले. शिक्षक संघटना व पालकांकडून शाळा सुरू होण्याची तारीख वाढविण्याबाबत मागील काही दिवसांपासून मागणी होत होती. शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळा सुरू करण्याची तारीख वाढविण्यासाठी घेतलेल्या संवेदनशील भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर