ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आरोग्य विभागात शेकडो कोटींचा एक्स-रे घोटाळा?:10 लाखांच्या मशीन्ससाठी मोजले 6 पट अधिक दर, मनसेचा खळबळजनक आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण सध्या भ्रष्टाचाराच्या मोठ्या वादात सापडले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आरोग्य विभागाच्या निविदा प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. “ज्या एक्स-रे मशीनची किंमत १० लाख रुपये आहे, ती ६१ लाखांना खरेदी करून सरकारी तिजोरीची लूट केली जात आहे,” असा दावा करत देशपांडे यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील व्यवहारांच्या चौकशीची मागणी केली आहे. संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने ‘जी ई एम २०२४’ (GeM 2024) अंतर्गत डिजिटल पोर्टेबल एक्स-रे मशीन खरेदीसाठी निविदा काढली होती. बाजारभावानुसार किंवा शासकीय पोर्टलवर या मशीनची किंमत साधारणतः १० लाख रुपये आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने याच मशीनसाठी प्रति नग ६१ लाख २० हजार रुपये मोजले आहेत. अशा एकूण ८० मशिनची खरेदी करण्यात आली असून, शासनाने ६ पट अधिक दर देऊन जनतेच्या पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप मनसेने केला आहे. उत्पादकांना डावलून वितरकांवर मेहेरनजर? या निविदा प्रक्रियेत ‘श्रद्धा डिस्ट्रीब्यूटर’ आणि ‘लक्ष्मी सर्जिकल’ या दोन कंपन्या पात्र ठरल्या होत्या, ज्यापैकी श्रद्धा डिस्ट्रीब्यूटरला हे कंत्राट मिळाले. “मूळ उत्पादक कंपन्यांना तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवून केवळ विशिष्ट वितरकांना झुकते माप का दिले जात आहे? या कंपन्यांचे आणि राजकीय नेत्यांचे काय लागेबांधे आहेत?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. चिनी उत्पादनांचा संशयास्पद वापर एक्स-रे मशीनसोबतच ‘मिडी एक्स डिव्हाइस प्रायव्हेट लिमिटेड’ (Midi X Device Pvt Ltd) या कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटावरही त्यांनी बोट ठेवले आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सीमावर्ती देशांतील (चीन इ.) उत्पादनांसाठी विशेष नोंदणी अनिवार्य आहे. स्वदेशी कंपन्यांना डावलून चिनी बनावटीच्या वस्तूंचा वापर करणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देऊन शासनाच्या धोरणांचाच उल्लंघन केले जात असल्याचे संदीप देशपांडे यांनी नमूद केले. दररोज एक प्रकरण मांडणार संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी करण्याची मागणी केली आहे. “आरोग्यासाठी बजेट नाही असे सांगणारे सरकार ६ पट जादा किमतीने खरेदी कशी काय करते?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, त्यांच्याकडे अशा १४ यंत्रसामग्री खरेदीचे पुरावे असून, येत्या काही दिवसांत दररोज एका नवीन घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या गंभीर आरोपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता शासन आणि तत्कालीन आरोग्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर