ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


घरात चहा बनवायचा असो, मुलांच्या दुधाचा ग्लास असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी दूध लागणार असो रोजच्या या गरजेचा खर्च आता वाढणार आहे. आधीच भाजीपाला आणि किराणा सामानाच्या वाढत्या किमतींमुळे घरखर्चाचे गणित बिघडले असताना आता दूधही महागले आहे.

अमूल, मदर डेअरी आणि पराग या तीन प्रमुख ब्रॅण्डनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. नवीन दर 12 नोव्हेंबर 2026 पासून लागू होत आहेत. त्यामुळे नियमित दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना आता प्रत्येक महिन्याला अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

अमूलच्या ताजा आणि गोल्डच्या दरात वाढ

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूलच्या प्रमुख पाउच दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. अमूल ताजा टोंड दुधाचा दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. तर अमूल गोल्डच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ झाली आहे. अमूल ताजामध्ये 3 टक्के, तर अमूल गोल्डमध्ये 6 टक्के मिल्क फॅट असते. कंपनीने प्रमुख पॅक आणि व्हेरिएंटच्या किमतीत सरासरी 4 ते 5 टक्के वाढ केल्याची माहिती दिली आहे. हे नवीन दर 12 नोव्हेंबरपासून देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लागू होणार आहेत.

मदर डेअरीचे दूधही 2 ते 4 रुपयांनी महागले

मदर डेअरीनेही ग्राहकांना दरवाढीचा धक्का दिला आहे. कंपनीने दुधाच्या विविध प्रकारांच्या किमतीत प्रतिलिटर 2 ते 4 रुपयांची वाढ केली आहे. फुल क्रीम दुधाचा दर 72 रुपयांवरून 76 रुपये झाला आहे. टोंड दूध आता 60 रुपयांऐवजी 62 रुपये प्रतिलिटर मिळेल. डबल टोंड दुधासाठी 54 रुपयांऐवजी 56 रुपये मोजावे लागतील. गायीच्या दुधाचा दर 62 रुपयांवरून 65 रुपये झाला आहे. व्हेंडिंग मशीनमधून मिळणाऱ्या टोंड दुधाची किंमतही 58 रुपयांवरून 60 रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे.

मदर डेअरीने उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आणि इतर इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे दर बदलल्याचे सांगितले आहे. कंपनी दिल्ली-एनसीआर परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा करते. त्यामुळे या भागातील ग्राहकांच्या घरखर्चावर या दरवाढीचा परिणाम होणार आहे.

पराग गोल्ड आणि टोंड दूधही महागले

अमूल आणि मदर डेअरीनंतर पराग दूधही महाग झाले आहे. लखनऊ दुग्ध संघाने दूध संकलन, प्रक्रिया आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याचे कारण देत दरात बदल केला आहे. पराग गोल्ड दुधाचा प्रतिलिटर दर 72 रुपयांवरून 76 रुपये करण्यात आला आहे. त्याच्या 500 मिली पॅकेटसाठी आता 36 रुपयांऐवजी 38 रुपये द्यावे लागतील.

पराग टोंड दुधाचा दर प्रतिलिटर 59 रुपयांवरून 61 रुपये झाला आहे. तर 500 मिली पॅकेटची किंमत 30 रुपयांवरून 31 रुपये करण्यात आली आहे. हे नवीन दर 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळच्या पुरवठ्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळपर्यंत ग्राहकांना जुन्या दराने दूध मिळेल.

महिन्याच्या बजेटवर किती परिणाम होणार?

दूध ही रोजच्या वापरातील वस्तू असल्याने प्रतिलिटर 2 ते 4 रुपयांची वाढही महिन्याच्या हिशेबात जाणवू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबात दररोज 2 लिटर दूध वापरले जात असेल, तर प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ झाल्यास महिन्याला 120 रुपये अधिक खर्च होतील. दरात 4 रुपयांची वाढ असल्यास हाच अतिरिक्त खर्च 240 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. दूध वापरण्याचे प्रमाण आणि निवडलेल्या ब्रँडनुसार हा खर्च बदलणार आहे.

भाजीपाला, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना दुधाच्या दरातही झालेली वाढ सामान्य कुटुंबांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. विशेषतः लहान मुलांसाठी किंवा मोठ्या कुटुंबासाठी रोज दूध खरेदी करणाऱ्यांना आता घरखर्चाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर