ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

संत, वारकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही:DCM एकनाथ शिंदे यांचा इशारा; कीर्तनकार कैलास आनंदेंशी साधला फोनवरून संवाद

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीडच्या गेवराई येथील कीर्तनकार कैलास आनंदे यांना अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितल्याचा कारणावरून 4 दिवसांपूर्वी गावगुंडांनी बेदम मारहाण केली होती. सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. महाराष्ट्रातील संत, महंत आणि वारकरी समाजावर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यातील गेवराई शहराजवळ अखंड हरिनाम सप्ताहाच्या हिशोबावरून गावातील कीर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे महाराज यांना काही गावगुंडांनी अमानुष मारहाण केली होती. त्यात ते जबर जखमी झाले होते. त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आज कैलास आनंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची व याविषयी स्वतः पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्रातील संत, महंत व वारकरी समाजावर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जरब बसेल अशी कारवाई करणार – शिंदे मी एसपी आणि पोलिसांना आरोपींना तात्काळ अटक करण्यास सांगतो. जे गुन्हेगार आहेत त्यांना ताबडतोब अटक होईल. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही. प्रत्येकावर कडक कारवाई होईल, असे ते म्हणाले. यावेळी कैलास आनंदे यांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. त्यावर ते म्हणाले, मी वारकरी संप्रदायातीलच आहे. पांडुरंगाचा भक्त आहे. वारकऱ्यांवर, संतांवर महाराष्ट्रात कुठेही अन्याय होता कामा नये. सरकार तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती केली जाईल. हल्लेखोरांना जरब बसेल अशी कारवाई केली जाईल. नेमकी काय घडली होती घटना? बीडच्या गेवराईत काही दिवसांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. कैलास महाराज आनंदे यांनी या सप्ताहाचा हिशोब मागितला होता. याचा राग धरून काही जणांनी त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडे, केबल वायर आदींच्या मदतीने बेदम मारहाण केली होती. ही घटना घडली तेव्हा महाराज आळंदीला जात होते. हल्लेखोरांनी त्यांना जातेगाव रोडवर गाठून त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती. सध्या कैलास आनंदे यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर