ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

खरीप पूर्व नियोजन व हुमणी अळी नियंत्रण मेळावा:टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन, ऊस पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन मेळावा संपन्न‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व नियोजन, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचा आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, मृदशास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके, कृषि अधिकारी पौर्णिमा गाडे, कृषि सहाय्यक शेषराव देशमुख व प्रगतशील शेतकरी जयकर मगर उपस्थित होते. “जमिनीचा सामू, विद्युत वाहकता आणि चुनखडीचे प्रमाण या त्रिसूत्रीच्या आधारे जमिनीच्या आरोग्याचे मूल्यमापन केले जाते. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असून, ते वाढवण्यासाठी आदर्श शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते व जिवाणू खतांचा वापर करावा. जमिनीचा पोत सुधारून सूक्ष्म जीवाणू वाढल्यास पिकांना अन्नद्रव्ये मिळून उत्पादन वाढेल,असा सल्ला डॉ. विजयकुमार पाटील यांनी दिला. मृदशास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके यांनी ऊस पिकाचे अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचे वेळापत्रक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा एकात्मिक वापर यावर प्रकाश टाकला. तसेच हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी तिच्या वाढीच्या अवस्था समजावून सांगत, भुंगेरे गोळा करणे, मशागत, जैविक व रासायनिक नियंत्रण अशा एकात्मिक उपाययोजना सुचवल्या. या मेळाव्यात सहाय्यक कृषि अधिकारी आचपाळे यांनी बियाणे उगवणक्षमता प्रात्यक्षिक सादर केले, तर आदिनाथ धुमाळ यांनी सोयाबीन पेरणीच्या ‘रुंदवाफा सरी’ पद्धतीचे फायदे सांगितले. अवधूत मेहत्रे यांनी बीजप्रक्रियेची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शेतकरी भाऊसाहेब पठारे, यशवंतराव रणनवरे, राजेंद्र कोकणे, शिवाजीराव धुमाळ, विनोद बोडके अवधूत घाडगे, प्रसाद धिरडे आणि गणेश घाडगे उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर