ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी?

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: देशसेवेसाठी भारतीय सैन्यात जाण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. आता सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना हे स्वप्न साकार करण्याची संधी आहे. या जिल्ह्यातील युवकांसाठी कोल्हापुरात 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान अग्निवीर भरती होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून नियोजन असून जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी याबाबत आढावा घेतला.

नुकतेच अग्निवीर भरती प्रक्रियाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी संचालक कर्नल प्रशांतसिंग, कर्नल संबित पात्रा, सुभेदार मेजर जसविंदर सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भीमसेन चवदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नोकरी सोडून शेती करायचा घेतला धाडसी निर्णय, शेवगा शेतीतून नशीब पालटलं, वर्षाला 12 लाखांची बंपर कमाई

बस, भोजन अन् पिण्याचे पाणी

अग्निवीर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या बसेस, भोजन, पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच गर्दी होऊ नये, यासाठी चोख वाहतूक व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

आमिषाला बळी पडू नका

अग्निवीर भरती ही पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रता यांच्या आधारावरच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी आर्थिक आमिष आणि फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन कर्नल प्रशांतसिंग यांनी केले आहे. भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र पाठवण्यात येणार आहे. 16 सप्टेंबर रोजी रात्रीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, अग्निवीरसोबतच महाराष्ट्र राज्याच्या महिला सेना पोलीस पदासाठी देखील भरती होईल. ही भरती  29 सप्टेंबरला होणार आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर