ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष…

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Teacher Husband Finished Wife : संशयाचं भूत माणसाला कोणत्या थराला नेईल सांगता येत नाही. अशीच एक घटना शादिपूरमधून समोर आली आहे. एका शिक्षिकेच्या हत्येचे भीषण सत्य समोर आलं आहे. शुक्रवारी रात्री आरोपीने आपल्या पत्नीसाठी सरप्राईज पार्टी दिली आणि तिला चिकन व बिअर खाऊ घातली. त्यानंतर शनिवारी सकाळी, संधी मिळताच, भांडी घासत असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यात त्याने कुकरच्या झाकणाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने शिक्षिकेला पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये बुडवून ठार मारलं. पोलिसांनी हत्येच्या आरोपीला न्यायालयात हजर करून तुरुंगात रवाना केलंय.
डोक्यावर मागून तीन वेळा प्रहार
दिलीपने चौकशीदरम्यान सांगितले की, सकाळी शालिनी घरात भांडी घासत होती. याच वेळी त्याने संधी साधून कुकरच्या झाकणाने तिच्या डोक्यावर मागून तीन वेळा प्रहार केला. त्यामुळे शालिनी बेशुद्ध पडली. यानंतर त्याने तिला पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाथटबमध्ये टाकले आणि तिचा गळा दाबून तिला मरेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवले. हत्येनंतर त्याने बाथटबचा व्हॉल्व्ह उघडून पाणी काढून टाकले, जेणेकरून रक्ताचे डागही पाण्यासोबत धुऊन जातील. यानंतर त्याने ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पण दिलीप स्वत:च्या जाळ्यात अडकला.
बाथटबचा व्हॉल्व्ह उघडला
घटनेनंतर दिलीपने बाथटबचा व्हॉल्व्ह उघडला. पाणी वाहू लागताच, रक्ताचे शिंतोडे आणि डागही पाण्यासोबत धुऊन गेले. पुरावे नष्ट केल्यानंतर तो आपल्या बाईकवरून सकाळच्या फिरायला गेला. थोड्या वेळाने तो परत आला आणि शहरात राहणाऱ्या त्याचे भाऊ भूपेंद्र आणि संदीप यांना फोन करून सांगितले की, शालिनी जिन्यावरून पडून जखमी झाली आहे. तो दोन्ही भावांसोबत तिला कारने तांबेश्वर मंदिराजवळील एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर त्याने मृतदेह भाड्याच्या घरी परत आणला.
दीड वर्षापासून नात्यात तणाव
पोलिसांनी नरजेच्या हालचालीवरून दिलीपवर संशय घेतला अन् तो खरा ठरला. चौकशीदरम्यान दिलीपने खुलासा केला की, गेल्या दीड वर्षापासून त्यांच्या नात्यात तणाव होता. तिचे दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. इतकेच नाही तर, त्याच्या नकळत प्रवास करण्यावरून आणि पगार मनाप्रमाणे खर्च करण्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. 8 ऑगस्टच्या सकाळी सुमारे 5:15 वाजता शालिनी अंगणात भांडी घासत होती. तो धावत तिथे गेला आणि कुकरच्या झाकणाने तिच्या डोक्यावर तीन वेळा वार केला. तिथंच तिचा मृत्यू झाला होता.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर