ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल?

15 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे: श्रावण महिना सुरू झाला असून या काळात ग्रहांच्या स्थितीतही काही बदल झाले आहेत. सध्या शनि महाराज मीन राशीत वक्री आहेत. राहू कुंभ राशीत, तर केतू सिंह राशीत आहे. शुक्र कन्या राशीत, बुध कर्क राशीत, सूर्य कर्क राशीत आणि गुरु कर्क राशीत आहेत. तसेच मंगळ मिथुन राशीत आहे. या ग्रहस्थितीचा मेष ते मीन राशींवर वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कोणत्या राशींना चांगल्या संधी मिळू शकतात? तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्यात? याबाबत ज्योतिषी तृप्ती भोसले यांनी लोकल18 च्या माध्यमातून सांगितले.

श्रावणात राशींवर ग्रहमानाचा प्रभाव..

तृप्ती भोसले यांनी सांगितले की, मेष राशीला साडेसातीचा काळ सुरू असल्याने जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि काही कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीसाठी आर्थिक बाबतीत चांगले बदल होतील, मात्र अति खर्च टाळावा. मिथुन राशीने करिअरचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत, तसेच कामाचे योग्य नियोजन करावे.

388 एकरांचं तपोवन, त्यात जपानी शैलीतलं महादेव मंदिर, महाराष्ट्रातलं प्रसिद्ध ठिकाण माहितीये का? Video

कर्क राशीसाठी गुरुच्या प्रभावामुळे कुटुंब, मानसिक समाधान आणि ज्ञानाच्या दृष्टीने काळ चांगला असून नवीन सुरुवातीसाठीही हा काळ अनुकूल आहे. सिंह राशीने नात्यांमध्ये संयम ठेवावा. कन्या राशीसाठी प्रेम, पैसा आणि सुख-सोयींचे विषय महत्त्वाचे ठरतील, मात्र अतिविचार टाळावा.

तूळ राशीसाठी 2 सप्टेंबरनंतर शुक्राच्या प्रभावामुळे प्रेम, व्यक्तिमत्त्व आणि आर्थिक बाबतीत चांगले बदल होऊ शकतात. वृश्चिक राशीच्या कामात बदल होऊ शकतात, त्यामुळे जुन्या कामांचा पाठपुरावा करावा आणि आर्थिक बाबतीत घाई करू नये. धनु राशीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे मानसिक शांतता आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे.

मकर राशीसाठी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. कुंभ आणि मीन राशींना साडेसातीमुळे अडचणी येऊ शकतात, मात्र हा काळ त्यांना अधिक मजबूत करणारा ठरू शकतो. श्रावणात अडथळे आले तरी घाबरू नये, परिस्थिती स्वीकारून सकारात्मक मार्ग काढावा आणि भगवान शिवांची आराधना करावी, असा सल्ला तृप्ती भोसले यांनी दिला आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर