ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी

1.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पुरस्काराने गौरव

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव दि. १५ ऑगस्ट २०२६ : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरी बजावत ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंचायत समिती मारेगाव येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कु. प्रतीक्षा गाडगे यांचा जिल्हास्तरीय ‘उत्कृष्ट ग्रामीण गृहनिर्माण अभियंता’ या विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यवतमाळचे पालकमंत्री मा.संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते प्रतीक्षा गाडगे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता , मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक आनंद पिंगळे व प्रवीण मस्के यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘महा आवास अभियान २०२५-२६’ अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रतीक्षा गाडगे यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रतीक्षा गाडगे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्हास्तरावर घेण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे पंचायत समिती मारेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याप्रसंगी मिळालेला हा सन्मान केवळ वैयक्तिक पुरस्कार नसून ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रतीक्षा गाडगे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
ग्रामीण विकासाच्या कार्याला पुरस्काराची पावती; मारेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर