ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं

18 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर: कोल्हापुरी पाहुणाचार अनेकांनी अनुभवला असेल. इकडं पाहुणा म्हणून घरी कुणी आलं की, तांबडा-पांढऱ्याचा बेत, फिरणं आणि इतर पाहुणचारही जोरात होतो. तसाच पाहुणाच कागल तालुक्यात हळदी येथे पाहुणा बनून आलेल्या मित्राचाही झाला. तो चांगला चार दिवस मित्राकडे राहिला आणि जाता-जाता चांगलाच धक्का देऊन गेला. मुरगूड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 24 तासांत त्याला पकडलं. पण या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

नेमकं घडलं काय?

हळदी येथील महादेश शंकर खराडे यांच्या घरात 12 ऑगस्ट रोजी चोरी झाली. याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. महादेव यांचा मुलगा मारुतीचा एक मित्र विनोद नारायण सुतार (वय 29) हा चार-पाच दिवसांपासून गायब असल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.

देवा, काय हे…! महिन्याचं बाळ, दूध पिताना ठसका लागला, श्वास कोंडला अन् क्षणात सगळं संपलं, आईच्या कुशीतच…

चोरी होण्याच्या पूर्वी विनोद हा खराडे यांच्या घरी चार दिवस मुक्कामाला होता. त्यानेच ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यात हे दागिने विकण्यासाठी विनोद कागल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिकेत कुडले यांच्या पथकाने सापळा रचला. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या गाडी अड्डयाजवळ विनोदला ताब्यात घेतले.

चौकशीतून शॉकिंग खुलासा

विनोद सुतार याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. विनोद हा चार दिवस खराडे यांच्या घरी मित्राकडे राहिला होता. तेव्हा त्यानेच घरातील तिजोरी फोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. मुरगूड पोलिसांनी 24 तासांत त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून 1 लाख 10 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

दरम्यान, विनोद सुतार याने चोरीची कबुली दिली. यात 70 हजार रुपयांची अर्धा तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ, 20 हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि 20 हजार रुपये किमतीच्या अडीच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा होत्या. एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर