ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

भांडणाची व्हिडिओ शूटिंग काढल्यावरून हात्तामध्ये थरार:चाकू अन् लोखंडी रॉडने हाणामारी, 5 जण जखमी, 8 जणांवर गुन्हा दाखल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सेनगाव तालुक्यातील हात्ता येथे भांडणाची शूटिंग काढण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारी मध्ये पाच जण जखमी झाली असून या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध सेनगाव पोलिसठाण्यात बुधवारी ता 24 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हात्ता येथील अनिल कांबळे व मोहन कांबळे यांच्यात बुधवारी तारीख 24 रात्रीच्या सुमारास वाद सुरू झाला. आमच्या भांडणाची व्हिडिओ शूटिंग का काढली या कारणावरून सुरू झालेला वाद शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी पर्यंत पोहोचला. यामध्ये लोखंडी रॉड, चाकू, लाकडाने मारहाण झाली. या मारहाणी मध्ये पाच जखमी झाले. या प्रकरणात कुंडलिक कांबळे यांनी रात्री उशिरा सेनगाव पोलिसठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांना गावातील अनिल कांबळे व लिंबाजी कांबळे यांनी चाकूने मारहाण करून जखमी केले तसेच त्यांचे आई-वडील सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करून जखमी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून सेनगाव पोलिसांनी अनिल व लिंबाजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात अनिल कांबळे यांनी तक्रार दिली की त्यांना आमच्या भांडणाची व्हिडिओ शूटिंग का काढली या कारणावरून मोहन कांबळे, विशाल कांबळे, आकाश कांबळे, रवी कांबळे, करण कांबळे, कुंडलिक कांबळे यांनी मारहाण केली. सदर भांडण सोडविण्यासाठी त्यांचे वडील मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली यावरून पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिसनिरीक्षक संग्राम जाधव, जमादार पवन चाटसे, एकनाथ राठोड, सुभाष चव्हाण पुढील तपास करत आहेत. या मारहाण प्रकरणात पाच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर