ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेचे रणशिंग:राष्ट्रवादीची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणकोणत्या दिग्गजांचा समावेश?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज आपल्या ४० स्टार प्रचारकांची जंगी यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या ही माहिती दिली. महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता ग्रामीण भागातील ‘मिनी मंत्रालय’ मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या या ४० प्रचारकांच्या माध्यमातून पक्ष ग्रामीण भागात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. या यादीमध्ये अल्पसंख्याक समाजाचे नेते, महिला प्रतिनिधी आणि युवक नेत्यांचा समतोल साधण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच चर्चेत असलेले नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी यांनाही स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमुख स्टार प्रचारक खालीलप्रमाणे: मंत्रिमंडळातील चेहरे: दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवाळ आणि धर्मरावबाबा आत्राम. खासदार: सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील. इतर महत्त्वाचे नेते: रूपाली चाकणकर (महिला प्रदेशाध्यक्षा), अमोल मिटकरी, सुरज चव्हाण, समीर भुजबळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती महापालिका निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने, ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकदवान प्रचार यंत्रणा उभी केली आहे. अनुभवी नेते, संघटनात्मक पदाधिकारी आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी यांचा समन्वय साधत प्रचार अधिक प्रभावी करण्याची रणनिती आखण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत रणांगणात उतरण्याची तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार असून, ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर