ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त चित्ररथाचे मोर्शीत स्वागत:चित्ररथातून ऐतिहासिक भिडे वाड्याची आकर्षक प्रतिकृती साकार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. या चित्ररथाचे बुधवार २० रोजी मोर्शी येथे आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोषात स्वागत करण्यात आले. हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा. समीर भुजबळ व आ. पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत हा चित्ररथ राज्यातील गावोगावी व शहरा-शहरांत फिरून समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे. चित्ररथामध्ये सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसह महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच महात्मा फुले लिखित पुस्तके, पेन यासारख्या ज्ञानाच्या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा तसेच भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची प्रतिकृती चित्ररथात साकारण्यात आली आहे. समता,बंधुता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश देणारा हा चित्ररथ मोर्शी शहरात दाखल होताच ढोल पथकाच्या गजरात, फटाके फोडून व फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. यावेळी मोर्शी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. चौकात चित्ररथाचे आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करताना उपस्थित मान्यवर व इतर. जयस्तंभ चौक व छत्रपती शिवाजी चौक येथेही चित्ररथाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या वेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर लेकुरवाडे, नगरसेवक रवींद्र गुल्हाने, नगरसेविका कांचन भोजने, वैभव भोजने, नितीन राऊत, मोहन मडघे, महेंद्र भातकुले, प्रशांत आजनकर, राजेंद्र भोजने, मंगेश भोजने, विनायक खाडे, किशोर सारडे, प्रशांत कांडलकर, अंबादास सिनकर, घनश्याम सिंगरवाडे, अनिकेत राऊत, गजानन अरसडे, सतीश लेकुरवाडे, सागर पाटील, सोनाली नवले यांच्यासह शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांच्या नागरिकांनी स्वागत उत्साहात स्वागत केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर