ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र प्रस्तावांची होणार फेरतपासणी:पालकमंत्र्यांची ग्वाही, समिती स्थापन; पात्र महिलांना मिळणार न्याय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र ठरलेल्या प्रस्तावांची आता फेरतपासणी केली जाणार आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. यासाठी सरकारने एक समिती गठीत केली असून, पात्र महिलांना त्यांचे लाभ मिळतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. या योजनेत मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्याने त्यांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात सुमारे ८० लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नेमका आकडा अद्याप स्पष्ट नसला तरी, तो काही लाखांमध्ये असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. योजना सुरू झाली तेव्हा अमरावती जिल्ह्यातून सुमारे ८ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६ लाख ५० हजार महिलांना सुरुवातीला पात्र ठरवून त्यांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया आणि सखोल तपासणी करण्यात आली, ज्यात अनेक महिला अपात्र ठरल्या. यामुळे अनेक महिलांनी आपण पात्र असूनही अपात्रतेच्या यादीत कसे आलो, असा प्रश्न उपस्थित करत लोकप्रतिनिधींकडे विचारणा केली आहे. पालकमंत्र्यांनी फेरतपासणीची ग्वाही दिली असली तरी, सरकारने स्थापन केलेली समिती कधीपासून काम सुरू करणार, फेरतपासणी किती दिवसांत पूर्ण होईल आणि गोठवलेले लाभ पूर्ववत कधी मिळतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरण्याचे काही प्रमुख निकष खालीलप्रमाणे आहेत: – कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असणे. – कुटुंबातील एखादा सदस्य आयकर दाता (प्राप्तीकर भरणारा) असणे. – अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असणे. – कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत किंवा निवृत्तीवेतनधारक असणे. – बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा ‘डीबीटी’ (DBT) पर्याय सक्रिय नसणे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर