ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेली २७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेत हजारो स्वामीभक्त सहभागी होत आहेत. सप्ताहानिमित्त विविध नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि हरिभक्त मंडळी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुक्यासह परिसरातील अनेक भजन मंडळे, कीर्तनकार आणि स्वामीभक्त या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार असल्याने सप्ताहाला विशेष रंगत प्राप्त झाली आहे. येत्या गुरुवारी, २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे करमाळा शहरात भव्य आगमन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ह.भ.प. विवेकानंद मंजरतकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. पालखी आगमनानंतर रात्री ८ वाजता महाआरती संपन्न होणार असून, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे साडेचार हजारांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या धार्मिक उत्सवामुळे करमाळा शहरासह परिसरात अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, अखंड हरिनाम सप्ताह, महाआरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा पालखी सोहळा यंदा २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या जवळपास तीन दशकांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे हजारो भाविकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळत असून, करमाळ्यात स्वामीभक्तीची परंपरा अधिक दृढ होत आहे. यंदाही भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान स्वामी समर्थ मंदिर फंड गल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे. सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये प्रवचने, कीर्तने, भजने, हरिपाठ तसेच पारायण यांचा समावेश आहे. दररोज सकाळी पारायण व प्रवचन, तर रात्री हरिपाठ आणि हरिकीर्तनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर