ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

विधिमंडळ:पावसाळी अधिवेशन उद्यापासून; युती आक्रमक, विरोधक बॅकफूटवर, दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महायुतीची आक्रमक खेळी आणि विरोधकांचा बचावात्मक पवित्र्यामुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही सभागृहांना अद्याप हक्काचा ‘विरोधी पक्षनेता’ मिळालेला नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चेमुळे विरोधी गोटात कमालीची अस्वस्थता आहे. जनतेचे ज्वलंत प्रश्न सभागृहात ताकदीने मांडण्याऐवजी विरोधक सध्या स्वतःचे अस्तित्व आणि आमदार टिकवण्यासाठी चाचपडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महायुती सरकार आल्यापासून विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षाचेच आमदार विविध मुद्द्यांवरून स्वतःच्या सरकारला कोंडीत पकडत असून मुख्य विरोधकांची भूमिका दुय्यम ठरत असल्याचे दिसते. दरम्यान, खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे आपल्या आमदारांवर विशेष लक्ष असणार आहे. एकूणच सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन हे विविध मुद्द्यांनी गाजणार असल्याचे संकेत आहेत. निधी कपात आणि फुटीच्या दडपणाखाली विरोधी आमदार विधानसभेत २० आमदारांसह ठाकरे गट हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असला तरी त्यांच्यावर सातत्याने फुटीची टांगती तलवार आहे. शरद पवार गटातूनही राजकीय स्थित्यंतराची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सरकारने विरोधी आमदारांच्या विकास निधीला कात्री लावल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. सरकारविरोधात अधिक आक्रमक झाल्यास मतदारसंघातील विकासकामे पूर्णपणे ठप्प होण्याची आणि वैयक्तिक कामे अडकण्याची भीती आमदारांना सतावत आहे. त्यामुळे अनेक विरोधी आमदारांनी मौन बाळगणेच पसंत केले आहे. केवळ जाधव, प्रभू आक्रमक ठाकरे गटाकडून भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांच्याव्यतिरिक्त एकाही आमदाराला सभागृहात आपला प्रभाव पाडता आलेला नाही. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अनुभवी नेत्यांची आणि माजी मंत्र्यांची फौज असली तरी अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाच्या अभावामुळे त्यांची शक्ती विखुरलेली दिसत आहे. याचाच फायदा हा सत्ताधारी पक्ष घेताना दिसत आहेत. धरणांत पाणीसाठा आटला, सरकारचे नियोजन कमी राज्यात गेल्या वर्षभरात उद्भवलेली अतिवृष्टी आणि काही भागांतील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी होरपळला आहे. धरणांमधील पाणीसाठा आटला असूनही सरकारने वेळेवर ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप होत आहे. या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांकडे अनेक महत्त्वाचे मुद्दे उपलब्ध आहेत: मुद्द्यांची उपलब्धता, मात्र विरोधकांत नियोजन नाही विरोधकांची अस्तित्वाची लढाई भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाची सत्ता आणि पालिकांमधील विजयाची नशा सध्या शिगेला पोहोचली असून ते विरोधकांना पूर्णपणे चिरडून टाकण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे जनतेच्या आवाजाला धार देण्याऐवजी विरोधक केवळ स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यात व्यस्त दिसणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर