ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

वसमत ग्रामीण पोलिसांची अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई:55 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा सह 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस विभागाचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून दिवसा व रात्रीच्या वेळी वाळू घाटाच्या मार्गावर अचानक वाहनांची तपासणी केली जात आहे. या शिवाय कालव्याच्या मार्गावरून येणाऱ्या वाहनांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव जवळील कालव्याच्या बाजूने दोन हायवामध्ये वाळू भरून आणली जात असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, आंबादास विभुते, नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने बुधवारी ता. 27 मध्यरात्री वाहनांची तपासणी केली. यावेळी दोन हायवामध्ये वाळू भरून वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच आवश्‍यक कागदपत्रांची मागणी केली असता त्यांना कागदपत्रे दाखविता आली नाही. त्यावरून पोलिसांनी दोन हायवा व वाळू असा 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बोराटे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिसांनी सिध्दोधन खाडे(रा. पळशी ता. वसमत), मुंजाजी नरवाडे (रा. रुपला पांढरी, जि. पुर्णा) यांच्यासह आर. जे. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व जय साई कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. जमादार विजयकुमार उपरे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर