ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिक घेणार शपथ:‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती : लोकसहभागातून संवर्धन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसुंधरेच्या रक्षणासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व नागरिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शपथ घेणार आहेत. त्याचप्रमाणे विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ घ्यावी. पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करावा. असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त तसेच विविध विभागांच्या प्रमुखांना ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम जिल्ह्यात राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. वाढते तापमान, पर्यावरणीय बदल आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता पर्यावरण संवर्धनासाठी सर्व स्तरांवर व्यापक जनजागृतीची गरज आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी कार्यवाही करावी. असेही सांगण्यात आले आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि ऊर्जा या पंचमहाभूतांच्या संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. असे आवाहन विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये पर्यावरण संवर्धनविषयक चर्चा, जनजागृती कार्यक्रम आणि शपथविधी आयोजित करण्यात यावेत. नागरिकांनी https://majhivasundh ara.in/en⁠ या पोर्टलवर जाऊन ई-शपथ घ्यावी. प्रमाणपत्र प्राप्त करावे. असेही आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. भावी पिढ्यांसाठी शहरात वृक्षारोपणाला होणार सुरुवात महानगरपालिकेद्वारे दरवर्षी सातत्याने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण अभियानाला सुरुवात केली जाते. आज तारखेडा, नमक फॅक्टरीजवळ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनपाने यंदा १० हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प घेतला आहे. या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात समाजसेवी संघटना, संस्था, शाळा, महाविद्यालये यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर