ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पालखी सोहळ्यात सुविधांसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे:पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढा

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दि. २५ जुलै रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखीतळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी योगेश डोके उपस्थित होते. विभागीय आयुक्त शितल तेली-उगले म्हणाल्या, पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात. नातेपुते येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या वाढीव जागेबाबत तात्काळ कार्यवाही करावी. पालखीतळावरील अतिक्रमणे काढून घ्यावीत. पालखी तळांवर हायमास्ट दिव्यांची संख्या वाढवावी. श्री संत सोपान काका पालखी सोहळ्यासाठी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेला भंडीशेगांव येथील पालखी तळावरील जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारतीबाबत आवश्यक ती कार्यवाही करून ३० जून पर्यंत जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी सपाटीकरण व मुरमीकरण करून पालखीतळ स्वच्छ व सुयोग्य करावा, सर्व आवश्यक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त शीतली उगले यांनी दिल्या. तसेच पालखी तळांवर कायमस्वरुपी सुविधा देण्याबाबत पालखीसोहळा प्रमुखांशी चर्चा करुन नियोजन करावे. यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली उगले यांनी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी येथील पालखीतळांची पाहणी केली. तसेच मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. उपलब्ध असणारे पालखीतळ सद्यस्थितीत कमी पडत असल्याने पालखी तळास वाढीव जागा मिळावी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, पालखी मार्ग व तळांवर सुविधा बाबत पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देवून ती कामे पुर्ण करण्यात येत आहेत. पालखी सोहळे जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सर्व भाविकांना, पालखी मार्ग व तळांवर आवश्यक सुविधा प्रशासनकडून उपलब्ध केल्या जातील असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर व तळांवर प्रशासकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. प्रमुखांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य दिले पालखीसोहळा प्रमुखांशी चर्चा करुन नियोजन करावे भंडीशेगाव, वाखरी येथील पालखीतळांची पाहणी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर