ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

नाशिकच्या जागेवर भाजपचे गणेश गिते ठाम‎:मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी खलबते‎, दोन कट्टर समर्थक उमेदवारीवरून आमनेसामने

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महायुतीमधील जागा वाटपाचा ‎नाशिक आणि जळगाव या दोन‎ जागांवरून महायुतीतील घटक‎ पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू ‎आहे. अशातच कुंभमेळा मंत्री गिरीश ‎महाजन यांचे खंदे समर्थक गणेश गिते‎ यांनी नाशिकच्या जागेवर थेट दावा‎ ठोकल्याने राजकीय हालचालींना वेग‎ आला आहे. नाशिकची जागा‎ भाजपलाच सुटणार असल्याचा ठाम‎विश्वास व्यक्त करत माध्यमांशी‎ संवाद साधताना गणेश गिते यांनी ‎निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले‎ आहेत.‎ स्थानिक स्वराज्य संस्था विधान‎परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी‎ अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन‎ दिवस शिल्लक असून, अद्यापपर्यंत‎ महायुतीत शिवसेना व भाजप यांच्यात‎ जागेवरून कुरघोडी सुरूच आहे.‎ 1 ‎जून रोजी निवडणुकीचे अंतिम चित्र‎स्पष्ट होणार असले तरी भाजपकडून‎ इच्छूक स्थायीचे माजी सभापती ‎गणेश गिते व उपाध्यक्ष नीलेश बोरा‎ दीपिका चव्हाण, संजय‎ चव्हाण व ‎समाजवादीकडून ‎मालेगावचे माजी महापौर ‎शहा न हिंद यांनी अर्ज‎ घेतले आहे. दराडे यांनी ‎अर्ज खरेदी करून‎ मतदारांच्या गाठीभेटी घेत‎ उमेदवारीवर दावा ठोकला ‎असला तरी, महायुतीतील‎ अंतर्गत स्पर्धा चव्हाट्यावर‎ आली आहे.‎ ”उमेदवारीचा शब्द मिळालाय”‎ पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ‎‎मला स्थानिक स्वराज्य‎‎ संस्था मतदारसंघातून‎‎ उमेदवारी देण्याचा शब्द ‎‎दिला होता. निवडणुकीत ‎‎लढण्यावर ठाम आहे, असे गणेश गिते यांनी म्हटले आहे. दावे आणि बदललेली राजकीय समीकरणे‎ यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघातील एकूण 623 मतदारांपैकी‎ भाजपकडे 190, शिवसेनेकडे 171, तर राष्ट्रवादीकडे 107 ‎मतदार आहेत. मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय गिते आणि ‎बोरा हे सक्रिय झाले आहे. गिते यांना स्थानिक आमदारांचा ‎विरोध असला तरी महाजन यांचे समर्थक आहे. शहराध्यक्ष‎ सुनील केदार आणि प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी कोणती‎ भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.‎ घट्ट मैत्री आणि दावेदारी‎ ‎राजकीय स्पर्धेत गिते‎‎ आणि बोरा आमनेसामने‎‎ असले तरी त्यांच्यात घट्ट‎‎मैत्री आहे. त्यामुळे ते‎‎ पाठीशी उभे राहतील. भाजपची शिवसेनेवर कुरघोडीची रणनिती उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी थेट दिल्ली आणि‎ मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.‎ दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत‎ झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,‎ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश‎ महाजन यांच्यात नाशिक व जळगावच्या जागांवरून ‎चर्चा झाली. या घडामोडींनंतर भाजप आणि ‎शिवसेनेच्या प्रमुख इच्छुकांनी उमेदवारी निश्चित‎ करण्यासाठी थेट मुंबईत तळ ठोकला आहे. सचिव‎ भाऊसाहेब चौधरी आणि उपनेते अजय बोरस्ते ‎यांनीही ही जागा शिवसेनेलाच मिळेल असा दावा ‎करत उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर