ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांची घोषणा:छगन भुजबळांऐवजी विदर्भाला दिली संधी; सुनील तटकरेंनी दिली माहिती

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या या जागेवर राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेच्या बाबतीत बैठकीत चर्चा केली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांना पक्षाने अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत. विधान परिषदेत गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्षे प्रतिनिधित्व केले. मध्यवर्ती बँक तसेच फेडरेशन यात राजेंद्र जैन यांनी काम केले आहे. तसेच विदर्भातून सुद्धा पक्षाला संधी देण्याचा विचार पक्षाचा होता. त्या दृष्टीने राजेंद्र जैन यांना संधी देण्याचे पक्षातून एकमताने ठरवले आहे. छगन भुजबळांचा योग्य तो सन्मान केला जाईल- सुनील तटकरे राज्यसभेच्या या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती. यावर प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले, एक असे आहे की यात आम्ही पक्षांतर्गतच चर्चा केली. भुजबळ साहेब पक्षाचे 99’चे संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत. अजितदादांनी निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णय प्रकृतेले महत्त्वाचे योगदान जसे आमच्या सर्वांचे आहे, तसेच योगदान भुजबळ साहेबांचे आहे. त्यामुळे त्यांचे ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला दिशादर्शक ठरणार आहे. त्यांचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्यासंदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत. समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद मिळावे- छगन भुजबळ दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत पक्षासमोर एक मोठी अट घातली असल्याची माहिती समोर आली आहे. आपला पुतण्या समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद मिळावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे समजते. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या बैठकीला पहिल्यांदाच समीर भुजबळ हे देखील उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आले असून, भुजबळांच्या अटीनुसार समीर भुजबळ यांना खरोखरच मंत्रिपद मिळू शकते, अशी दाट शक्यता आता वर्तवली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर