ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तर आश्चर्य नाही:गिरीश महाजनांचे सूचक विधान; अनेक टीकाकार आज भाजपत असल्याचा दिला दाखला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गिरीश महाजन यांच्या नेतृ्त्वात गुरुवारी नाशिक येथील मनसे व ठाकरे गटाचे बडे पदाधिकारी भाजपमध्ये आले. यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे व त्यांच्या समर्थकांनी या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. विरोधी पक्षांनीही या प्रकरणी भाजपला खडेबोल सुनावले. पण गिरीश महाजन यांनी राजकारणातील वास्तव मांडत या टीकेला फारसे महत्त्व नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, जे आमच्यावर टीका करतात, ते उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात. उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको. भाजपचा विस्तार सुरू हेच वास्तव ते म्हणाले, राजकारणात विरोध व टीका ही कायमस्वरुपी नसेत. आज भाजपमध्ये असणारे अनेक नेते पूर्वी भाजपविरोधात बोलत होते. पण आज तेच नेते भाजपमध्ये आहेत. आमदार व मंत्री अशा विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. यावरून पक्षवाढ हीच खरी राजकीय वस्तुस्थिती आहे हे स्पष्ट होते. भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. भाजपकडे विविध विचारांचे नेते येत आहेत. ही बाब पक्षाची ताकद दर्शवणारी आहे. पक्षाचा विस्तार होत आहे हीच खरी गोष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणी पक्षावर होणाऱ्या टीकेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. राजकारणात काहीही होऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. इतरांचे नेते घेणे हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण – संजय राऊत उल्लेखनीय बाब म्हणजे संजय राऊत यांनी काल नाशिकमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावरून भाजप व गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. जे आमच्याकडून गेले किंवा मनसेतून गेले ते भटकेच आहेत. गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात. पण त्यांनाही नगरपालिकेत फटका बसला आहे. त्यांची पत्नी निवडून आली, पण इतर कारणांमुळे त्यांना त्यांना फटका बसला. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. गौतम अदानी सुद्धा भाजपचे सदस्य आहेत. इतरांचे आमदार, खासदार, नेते आपल्या पक्षात घेणे हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे, असे राऊत म्हणाले. हे ही वाचा… मुंबईत युती, आघाडीच का करावी लागते?:BMC निवडणुकीत 30% चा जादुई टप्पा काय? स्थानिक मुद्दे विजयाचे समीकरण कसे बदलतात? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही पक्षांची सध्याची राजकीय व निवडणूक कामगिरी पाहता ही युती आवश्यकही वाटते. पण राज्याच्या राजधानीतील आतापर्यंतच्या निवडणुका पाहिल्या मुंबईत केवळ ठाकरेंसाठीच नव्हे तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांसाठी युती किंवा आघाडीचे राजकारण अत्यावश्यक ठरते. यासाठी येथील 30% मतांचे समीकरण फार महत्त्वाचे असल्याचे मानले जाते. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर