ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

महाराष्ट्राचा दाखला देत इराणचा ट्रम्पवर हल्ला:महाराष्ट्राच्या संपन्नतेचा पोस्ट केला VIDEO; भारत ‘नरक’ असल्याच्या विधानाचा समाचार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिकेशी यशस्वीपणे दोनहात करणाऱ्या इराणने आता महाराष्ट्राच्या संपन्नतेचा दाखला देत थेट अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत नरकासमान असल्याची टीका करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कुणीतरी सांस्कृतिक शुद्धीकरणाची सफर बुक करायला हवी, असे इराणच्या मुंबई स्थित उच्चायोगने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माधारित नागरकित्वासंबंधी लिहिलेल्या एका पत्रात भारत व चीन हे नरकासमान असल्याची टीका केली आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांची ती टिप्पणी व अमेरिकन दुतावासाने त्यावर दिलेले स्पष्टीकरण आम्ही पाहिले. पत्रातील विधान अपुऱ्या माहितीवर आधारित व अनुचित आहे. भारत व अमेरिकेतील संबंधांचे प्रतिबिंब त्यात नक्कीच नाही, असे भारताने म्हटले आहे. त्यानंतर आता इराणच्या मुंबई स्थित उच्चायोगानेही या मुद्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतात या अन् मग बोला इराणच्या मुंबई स्थित महावाणिज्य दुतावासाने गुरुवारी रात्री उशिरा महाराष्ट्राच्या संपन्नतेचा दाखला देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात महाराष्ट्राची निसर्गसंपन्नता किती भव्य आहे याचा दाखला दिला. तसेच ट्रम्प यांच्यावर शेलक्या शब्दांत निशाणाही साधला. कुणीतरी ट्रम्प यांच्यासाठी सांस्कृतिक शुद्धीकरणाची सफर बुक करायला हवी. तेव्हाच कदाचित त्यांची ही वायफळ बडबड बंद होईल. कधीतरी भारतात येऊन बघा. मग बोला, असे इराणी दुतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इराणी दुतावासाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आत्ता पाहू काय होता नेमका वाद? अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विख्यात रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांचा एक व्हिडिओ आपल्या ट्रूथ सोशल साइटवर पोस्ट केला होता. सोबत सॅव्हेज यांच्या संभाषणाचे एक विस्तृत पत्रही त्यांनी जोडले होते. मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळावे यासाठी परदेशी नागरीक अमेरिकन कायद्यांचा फायदा घेण्यासाठी शेवटच्या महिन्यात अमेरिकेत येतात, असे सॅव्हेज म्हणाले होते. तसेच भारत व चीन हे देश नरकासमान असल्याचाही त्यांनी दावा केला होता. ट्रम्प यांनी सॅव्हेज यांचा व्हिडिओ स्वतःच्या ट्विटर हँडलवर शेअर केल्यामुळे त्यांचा सॅव्हेज यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे मानले जात आहे. काय आहे जन्मसिद्ध नागरिकत्वाचा विषय? जे पालक अमेरिकेचे नागरीक किंवा कायमचे रहिवासी नाहीत, त्यांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आपोआप मिळणारे नागरिकत्व नाकारण्याचा कार्यकारी आदेश ट्रम्प प्रशासनाने काढला आहे. या आदेशावर स्वाक्षरी करून एक वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. 1 एप्रिल रोजी या प्रकरणी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असता सदर आदेश रद्द करण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यानंतर काही आठवड्यातच ट्रम्प यांनी या आदेशाचे समर्थन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर