ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

आमदार धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत:परळीतील ‘मराठा भवन’च्या जागेवरून नवा वाद, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोरील राजकीय आणि कायदेशीर अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. परळीत ‘मराठा भवन’साठी दिलेल्या जागेवरून आता एक मोठा वाद उफाळून आला असून, धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत धनंजय मुंडे यांच्यासह परळी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते गत १४ मे रोजी परळीमध्ये अत्यंत उत्साहात ‘मराठा भवन’चे भूमिपूजन करण्यात आले होते. या भवनासाठी २८ गुंठे जमीन देण्यात आली होती. मात्र, आता हीच जमीन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘श्री दत्त देवस्थान थोरले देवघर’ या संस्थेचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी ही जमीन देवस्थानच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. योगेश गोस्वामी यांनी यासंदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर २८ गुंठे जमीन ही वर्ग-२ ची ‘इनामी जमीन’ आहे. असे असतानाही केवळ राजकीय फायद्यासाठी संगनमत करून, बनावट कागदपत्रांच्या आधारे देवस्थानच्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा ‘मराठा भवन’साठी देण्यात आला आहे. मुंडेंसह मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांवर कारवाईची टांगती तलवार! श्री दत्त देवस्थान संस्थानने बीड जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांसह एक पत्र सोपवले आहे. या पत्रात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत धनंजय मुंडे (स्थानिक आमदार व माजी मंत्री), पोपट निगळ (मुख्याधिकारी, परळी नगर परिषद), पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी (नगराध्यक्ष, परळी) या तिघांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. हायकोर्टात जाण्याचा आणि रस्त्यावरील लढाईचा इशारा ‘मराठा भवन’साठी दिलेल्या जागेवरून देवस्थानच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली असून, जर जिल्हा प्रशासनाने या बनावटगिरी प्रकरणी तातडीने धनंजय मुंडे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत, तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संस्थानने दिला आहे. या नवीन वादामुळे परळीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, मराठा भवनच्या भूमिपूजनावरून श्रेय घेणाऱ्या धनंजय मुंडेंची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर