ब्रेकिंग न्यूज
⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती
SP News Maregaon

Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Nagpur Teacher Couple Death : दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंद साजरा होत आहे. पाडवा अन् भाऊबीज बाकी असताना सर्वांना आपल्या गावाकडं जाण्याची ओढ लागलीये. बस गाड्या अन् रेल्वे देखील भरून वाहताना दिसत आहेत. अशातच आता नागपुरातून मन हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. नागपुरात कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेल्या शिक्षक दांपत्याने गॅलरीत आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दोघंही शिक्षक.. अन् दिवाळीला घरी आले
नागपूरमधील बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवतीनगर इथं ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण नागपुरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मनीष प्रल्हाद गणवीर आणि सोनाली मनीष गणवीर असं मयत पती आणि पत्नीचं नाव असून दोघंही गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. दिवाळीला सुट्टी असल्याने दोघंही मागच्या आठवड्यात नागपुरला आले अन् तिथंच त्यांनी आयुष्याची दोर कापली.

Nagpur Crime : महागड्या iPhone हौस भागवण्यासाठी सुनेचा धक्कादायक पराक्रम, सासूच्याच दागिन्यांवर डल्ला अन् असं फुटलं भांडं!
ऑगस्टमध्ये लग्न अन् खटके उडू लागले
मनीष आणि सोनाली यांनी ऑगस्टमध्ये लग्न केलं होतं. दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर हे दोघांचं दुसरं लग्न होतं. ऑगस्ट महिन्यातच कोर्ट मॅरेज करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली, पण हा निर्णय त्यांचा चुकीचा ठरला दोघांमध्ये खटके उडू लागले. मयत मनीष यांचे आई-वडील नातेवाइकांसह बौद्धगया इथं गेले होते. ते मनीष अन् सोनाली यांच्या संपर्कात होते. पण शनिवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला अन् रात्री दोघांनी राहत्या घरी आयुष्य संपवलं.
आईने भाच्याला घरी पाठवलं अन् गॅलरीत…
दरम्यान, या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सुरू आहे. दोघांचा फोन लागत नसल्याने मनीषच्या आईने आपल्या भाच्याला घरी आहे की नाही, हे पाहण्यासाठी पाठवलं होतं. भाच्याला घरी काही दिसलं नाही. बेल वाजवली तरी काही आतून रिस्पॉन्स आला नाही. त्यानंतर तो टिनाच्या शेडवर चढला. दुसऱ्या माळ्यावरील गॅलरीत गेला. खिडकीतून बघितले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना आणि नातेवाईकांना याची माहिती दिली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर