ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अंगणवाड्यांना 300 दिवस पोषण आहार द्या:‘टेक होम रेशन’चे बालहक्क संरक्षण आयोगाचे निर्देश : अंमलबजावणी सुरु‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंगणवाड्यांमधील बालकांना ३०० दिवस पोषण आहार देणे अनिवार्य असल्यामुळे ‘टेक होम रेशन’ योजना उन्हाळ्यात राबवण्यात आली. यामुळे कडाक्याच्या उन्हात बालकांना अंगणवाड्यांमध्ये येण्याची आवश्यकता नाही. तर त्यांच्या घरीच पोषण आहार पोहोचवण्याची सोय करण्यात आली आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने अंगणवाड्यांना एक महिना सुटी देण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी केंद्र शासनाच्या बालकांना ३०० दिवस पोषण आहार देण्याच्या नियमांचे पालनही करायचे होते. त्यामुळे पालक व स्वमर्जीने उन्हाळी सुटीत जे बालक अंगणवाडीत आले त्यांना तेथे तसेच ज्यांना अंगणवाडीत येता आले नाही त्यांच्या घरी पोषण आहार पोहोचवण्यात आला. जिल्ह्यात एकूण २५९२ अंगणवाड्या असून येथे सुमारे १ लाखा बालक प्राथमिक धडे घेत आहेत. प्रचंड उकाडा व उष्ण वातावरणात बालकांना अंगणवाडीत बोलावणे योग्य नसल्याने सकाळी ८ ते १० पर्यंतच अंगणवाडी सुरू ठेवली जात आहे. या कालावधीत केवळ बालकांचे मनोरंजन होईल, असे हलके शिक्षण दिले जात आहे. बालकांचे पोषण थांबू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे. कारण, अंगणवाड्यांमध्ये येणारी बहुतांश बालकं ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील असतात. त्यांना दररोज पोषक आहार मिळणे आवश्यक आहे. पोषक अन्नाशिवाय बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढीत कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने राज्य शासनाने पोषण आहार देण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळी सुटीतही घरपोच आहार देण्याची व्यवस्था ^महिन्यातून २५ दिवस तसेच वर्षभरात अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देणे अनिवार्य आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत बालकांच्या घरी पोषण आहार पोहोचवला जातो. एवढेच नव्हे तर जे बालक अंगणवाडीत येतात त्यांना तेथे पोषण आहार दिला जातो. – विलास मरसाळे, उपकार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर