ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

स्वच्छतेत आघाडी; चांदूरबाजार बस स्थानक विभागामध्ये तिसऱ्यास्थानी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शासनाच्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात चांदूर बाजार आगाराने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, विभागात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने ही स्पर्धा राबवण्यात आली होती. या स्पर्धेचा पुरस्कार आगारप्रमुख प्रवीण डायलकर यांनी स्वीकारला. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने हे अभियान राबविण्यात आले होते. अभियानांतर्गत राज्यातील विविध बसस्थानकांची तपासणी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील आठ बसस्थानकांची जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाद्वारे पाहणी करण्यात आली होती. स्वच्छता, प्रवासी सुविधा, परिसराचे सौंदर्यीकरण, व्यवस्थापन व देखभाल अशा विविध निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून अमरावती जिल्ह्यातील चार बसस्थानकांनी प्रादेशिक स्तरावर स्थान मिळविले आहे. त्यामध्ये चांदूर बाजार बसस्थानकाने ‘ब’ गटात तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच उल्लेखनीय सेवा बजाविणाऱ्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चांदूर बाजार आगाराच्यावतीने आगार प्रमुख प्रवीण डायलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह तसेच दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर