ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Vijay Narayan Murder Case : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता बेळगावमधून अशी काही बातमी समोर आलीये, ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावतील. बेळगावात एका आईनेच आपल्या 24 वर्षाच्या तरण्याताठ्या पोराला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. आईच्या एका गोष्टीला पोराचा विरोध होता. त्यानंतर आईनेच पोराच्या मृत्यूचा सापळा रचला अन् त्याला संपवलं. या प्रकरणात आईसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
आईने मुलाला संपवण्याचा कट रचला
विजय नारायण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो आपल्यासोबत बेळगावातील मालमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. आईच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने कट रचून खून विजयची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृताची आई ‘मीना नारायण’ आणि ‘राकेश जामुनी’ यांच्यात अनैतिक संबंध होते आणि मृत विजय याला विरोध करत होता. यामुळेच मुलाला संपवण्याचा कट मीनाने रचला अन् पोटच्या पोराला संपवलं.
कोल्ड ड्रिंकच्या मदतीने झोपेच्या गोळ्या दिल्या
राकेशने विजयला कारमधून एका ठिकाणी नेले, तिथे अन्य आरोपींच्या मदतीने कोल्ड ड्रिंकच्या मदतीने झोपेच्या गोळ्या मिसळून विजयला पाजण्यात आलं. राकेश त्यानंतर बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या गळ्याभोवती ओढणी आवळून खून करण्यात आला. सचिन कांबळे, मनोज कांबळे, तम्मण्णा कांबळे आणि एकनाथ कांबळे यांच्या मदतीने मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगतच्या गटारात टाकला गेला आणि सर्व आरोपी पसार झाले होते.
आईसह सहा जणांना अटक
पोलिसांनी या प्रकरणानंतर तातडीने कारवाई सुरू केली. 3 नोव्हेंबर रोजी केएलई छत्रीजवळील गटारात मृतदेह आढळल्यानंतर मालमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणात आईसह सहा जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर